Shahaji Thombre, district vice-president of 'Rajya Shala', has given leave to Sawant group.jpg 
सोलापूर

माजी शिक्षक आमदार सावंतांना दुसरा धक्का ! 'राज्य शाळा'चे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी ठोंबरेंची सोडचिठ्ठी

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातील निवडणूक प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. त्यातच फोडाफोडीचे राजकारण ही रंगू लागले आहे. ऐन निवडणूकीत अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांना दुसरा धक्का बसला आहे. राज्य शाळा कृती समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि दत्तात्रय सावंत यांचे कट्टर समर्थक शहाजी ठोंबरे यांनी सावंत गटाला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार रेखा पाटील यांच्या मागे ताकद उभी केली.

कृती समितीचे बिनीचे शिलेदारच सावंतांपासून दुरावल्याने विरोधी उमेदवारांचा विजयाचा आत्मविश्वास आणखी दुणावला आहे. राज्यात अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रथमच महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने आले आहेत.

काॅग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने जयंत आसगावकरांसाठी आपली शक्ती आणि ताकद पणाला लावली आहे. तर भाजपने ही शिक्षक मतदार संघावर वर्चस्व मिळवण्याचा चंग बांधला आहे. महाविकास आघाडी, भाजप आणि अपक्ष उमेदवार सावंत यांच्यातील चुरस वाढली असतानाच माजी आमदार सावंत यांच्यासोबत असलेले अनेक पदाधिकारी ऐन निवडणूकीत त्यांच्यापासून दूर गेले आहेत. यापूर्वीच कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी बाहेर पडून महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता कृती समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी ठोंबरे यांनी ही सावंतांच्या विरोधात भूमिका घेत अपक्ष उमेदवार रेखा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

कृती समितीला लागलेल्या गळतीमुळे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि भाजपने आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी तालुकानिहाय शिक्षकांच्या बैठका आणि मेळावे घेत रान उठवले आहे. दोन्ही राजकीय पक्षाने शिस्तबध्द पध्दतीने  राबवलेल्या प्रचार यंत्रणे पुढे अपक्ष उमेदवार सावंत कशा पध्दतीने टिकून राहतात याकडे लक्ष लागले आहे.

सहा वर्षात विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. जुनी पेन्शनचा प्रश्न अजून कायम आहे. प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक भवन बांधण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे माझ्यासारखे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी वेगळा विचार केला आहे. 
- शहाजी ठोंबरे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष-राज्य शाळा कृती समिती. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT