Shantanu Vyavahare who came fifth in the center in the 10th examination came first in the re examination 
सोलापूर

दहावी परीक्षेत केंद्रात पाचवा आलेला शंतनू व्यवहारे फेरतपासणीत थेट प्रथम क्रमांकावर 

सूर्यकांत बनकर, करकंब

करकंब (सोलापूर) : दहावीच्या परीक्षेत तब्बल 95.60 टक्के गुण मिळूनही तो समाधानी नव्हता. त्यामुळे त्याने फेरतपासणीचा निर्णय घेतला. पण पुणे बोर्डाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी करकंब येथील 'सकाळ' प्रतिनिधीने पाठपुरावा केल्यानंतर बोर्डाला दखल घेणे भाग पडले. आणि तब्बल तीन महिन्यानंतर पाच गुण वाढल्याचा बोर्डाचा ईमेल आज (सोमवार) त्याला मिळाला. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. विशेष म्हणजे त्याचे फक्त पाच गुणच वाढले असे नाही तर तो चक्क दहावीच्या परीक्षेत आता प्रशालेत आणि करकंब केंद्रातही पहिला आला आहे. ही कहाणी आहे करकंब येथील शंतनू व्यवहारे याची. 
करकंब येथील रामभाऊ जोशी प्रशालेत शिकणाऱ्या शंतनूस 29 जुलै 2020 रोजी लागलेल्या दहावीच्या निकालामध्ये 95.60 टक्के म्हणजे 478 गुण मळाले होते. पण एवढे गुण मिळूनही तो समाधानी नव्हता. त्यामुळे त्याने बोर्डाकडून मराठी, इंग्रजी, गणित, इतिहास आणि भुगोल या विषयाच्या आपल्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतिची मागणी करत फेरतपासणीसाठी रीतसर अर्ज केला होता. गुणवाढीचा आत्मविश्वास असल्याने बोर्डाच्या निर्णयाकडे त्याच्यासह त्याच्या माता-पित्यांचेही लक्ष लागले होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बोर्डाकडून होणारी दिरंगाई आणि पाठपुराव्याला येणारे अपयश पाहून त्यांनी 'सकाळ' प्रतिनिधी सूर्यकांत बनकर यांच्याकडे न्यायाची मागणी केली. त्यानुसार 'सकाळ' प्रतिनिधीने बोर्डाकडे भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधल्यानंतर यंत्रणा गतीमान झाली. मागणी केलेल्या विषयांच्या उत्तरपत्रिका ई-मेलद्वारे पाटविण्यात आल्या. त्यांची विषय शिक्षकांकडून रितसर तपासणी करुन बोर्डाकडे अहवाल पाठविण्यात आले. पण त्यावरही निर्णय घेण्यास दिरंगाई होवू लागल्यानंतर पुन्हा 'सकाळ' प्रतिनिधीने पाठपुरावा चालू ठेवला. शेवटी आज (सोमवार) शंतनू व्यवहारे याचे इंग्रजी विषयाचे दोन, मराठीचे दोन व भूगोल विषयामध्ये एक असे एकूण पाच गुण वाढल्याचे पत्र त्यांना मिळाले आहे. त्यामुळे त्याचे एकूण गूण आता 483 झाले आहेत. करकंब केंद्रात प्रथम क्रमांक मिळविलेल्या सानिका भंडारे हिला 482 गुण आहेत. त्यामुळे केंद्रात पाचव्या नंबरवर असणाऱ्या शंतनूने फेरतपासणीअंती थेट प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT