Shivaji Maharaj Jayanti
Shivaji Maharaj Jayanti  sakal
सोलापूर

शिवजयंती थाटात की साधेपणानेच?

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर ३१ जानेवारीला राज्य सरकारने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. मात्र, सार्वजनिक कार्यक्रम, आंदोलन, मोर्चा, सभा व मिरवणुकीस परवानगी दिलेली नाही. शिवजयंती पाच दिवसांवर असतानाही राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पोलिस व जिल्हा प्रशासनानेही राज्य सरकारकडेच बोट दाखविले आहे. त्यामुळे यंदाची शिवजयंती उत्साहात की साधेपणानेच साजरी करावी लागणार, यासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मागच्या वर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणानेच साजरी करावी लागली होती. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून बहुतेक नागरिकांनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यास परवानगी मिळावी, अशी शिवप्रेमींची मागणी आहे. अनेक संघटनांनी पोलिस व जिल्हा प्रशासनाकडे निवेदनेही दिली आहेत. परंतु, त्यासंबंधीचा निर्णय स्थानिक पातळीवर नव्हे तर राज्य पातळीवर होईल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान, शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जमावबंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणुकीस परवानगी नाकारली आहे. सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सभा, मोर्चा, आंदोलन, मिरवणूक काढता येणार नाही, असेही त्या आदेशात नमूद केले आहे. परंतु, पंढरीच्या पांडुरंगाची नुकतीच माघी यात्रा उत्साहात पार पडली. त्याच धर्तीवर शिवजयंती साजरी करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली जात आहे. त्यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.

दोन दिवसांत राज्य सरकारचा निर्णय

छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी व्हावी, अशी मागणी होत आहे. जानेवारीअखेरीस राज्य सरकारने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले, परंतु सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाणार आहे. तरीही, राज्य सरकारने अजूनपर्यंत त्यासंदर्भातील निर्णय घेतला नसल्याने संभ्रम कायम आहे. पुढील दोन दिवसांत राज्य पातळीवर त्याचा निर्णय होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT