Shri Sant Damaji Sahakari Sugar Factory election Samadhan Autade one seat Unopposed solapur
Shri Sant Damaji Sahakari Sugar Factory election Samadhan Autade one seat Unopposed solapur  sakal
सोलापूर

सोलापूर : दामाजीच्या आखाडयात सत्ताधाऱ्यांची एक जागा बिनरोध

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज दाखल 328 उमेदवारांपैकी 281 जणांनी माघार घेतली सध्या आखाड्यात 20 जागेसाठी 47 उमेदवार अर्ज आखाड्यात शिल्लक आहेत सत्ताधारी गटाचे आ. समाधान आवताडे यांना आज एक जागा बिनविरोध करण्यात यश आले तर पोटनिवडणुकीत एकमेकाच्या विरोधात लढलेले भालके व परिचारक समर्थकांनी दामाजीसाठी एकत्र येवून समविचारी गटातून सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रांत करायला गर्दी चे स्वरूप प्राप्त झाले विद्यमान आ.समाधान आवताडे यांच्या गटाला आव्हान देण्यासाठी अनेक मातब्बरांनी गेल्या काही महिन्यापासून तयारी केली होती मात्र त्यांचे अर्ज छाणणीत बाद झाल्यामुळे सत्ताधारी गटाला कोण आव्हान देणार ?

याची उत्सुकता सभासदांना लागून राहिले होते दरम्यान पोटनिवडणुकीत अवताडे यांच्या विजयासाठी परिचारक समर्थकाने प्रयत्न केले होते. दोघे परस्परविरोधी लागल्यास विरोधी गटाला फायदा होऊ शकेल दोघांनी एकत्र यावे अशी भूमिका यापूर्वी मांडण्यात आली होती मात्र त्याप्रमाणे याही निवडणुकीत दोघे एकत्र येतील अशी अटकळ बांधली जात असतानाच आज परिचारक समर्थक दहा जागेवर,तर भालके गट नऊ जागा लढवित समविचारी गट करून आव्हान दिले.सहकारी संस्था गटातून सिद्धेश्वर अवताडे यांच्या विरोधात सत्ताधारी गटातून जगन्नाथ रेवे यांनी आव्हान दिले इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये 28 उमेदवारी अर्ज पैकी 27 जणांनी माघार घेतल्यामुळे विद्यमान संचालक अशोक केदार हे या प्रवर्गातून बिनविरोध निवडले गेले मंगळवेढा ऊस उत्पादक गटात उमेदवारी अर्ज दाखल केले बबनराव आवताडे यांनी आपला अर्ज माघार घेत मागे घेतला.

जागावाटपावर तोडगा विषयी काढण्यासाठी दोन दिवस स्थानिक नेत्यांनी जिवाचे रान केले त्यामुळे उमेदवार निवडताना काहींना थांबावे लागले तर काहींना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे या निमित्ताने बोलताना व्यक्त केला व त्यावर आपली भूमिका लवकरच जाहीर करू असा निर्णय घेतला त्यामुळे दामाजीचा आखाडा आता चुरशीचा होणार हे स्पष्ट झाले. उमेदवारी निश्चित करताना दोन्ही गटाकडून जातीय समीकरणाबरोबर त्या गटात असलेल्या एकूण सभासदांचा देखील यामध्ये विचार केला गेला. आ.समाधान आवताडे यांनी विद्यमान संचालकातील 10 जणांना पुन्हा संधी दिली तर 11 नवीन चेहरे दिले.

मंगळवेढा उत्पादक मतदार संघ-

आ. समाधान आवताडे,राजेंद्र सुरवसे, नीलाताई अटकळे गोपाळ भगरे, गौरीशंकर बुरकुल,मुरलीधर दत्तू

ब्रम्हपुरी उत्पादक मतदार संघ-

राजेंद्र सर्जेराव पाटील, अशोक भिंगे, सचिन चौगुले,राजेद्र चरणूकाका पाटील,दयानंद सोनगे,भारत बेदरे

मरवडे उत्पादक मतदार संघ -

प्रदीप खांडेकर,गणेश पाटील, बसवेश्वर पाटील,शिवानंद पाटील,औदुंबर वाडदेकर,रेवणसिद्ध लिगाडे,

भोसे उत्पादक मतदार संघ --

अंबादास कुलकर्णी,आबा बंडगर ,उमाशंकर कनशेट्टी,गौडाप्पा बिराजदार,बसवराज पाटील,भिवा दौलतडे,

आंधळगाव उत्पादक मतदार संघ--

सुरेश भाकरे, विनायक यादव, बाळासो शिंदे,महादेव लुगडे,दिगंबर भाकरे,प्रकाश पाटील,

अनुसुचित जाती/जमाती मतदार संघ--

यूवराज शिंदे,तानाजी कांबळे

भटक्या विमुक्त जाती/जमाती मतदार संघ-

विजय माने,तानाजी खरात

महिला राखीव मतदार संघ--

स्मिता म्हमाणे,कविता निकम,लता कोळेकर,निर्मला काकडे,

सोसायटी मतदार संघ

जगन्नाथ रेवे, सिद्धेश्वर आवताडे, या प्रमुख लढती लक्षवेधक ठरणार आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT