palkhi marga
palkhi marga  sakal
सोलापूर

Solapur : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गामुळे वारकऱ्यांना सुखदायक वारी

सकाळ वृत्तसेवा

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग होण्यासाठी सुमारे ५० वर्षे वाट पाहावी लागली. पालखी महामार्गाचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रबळ इच्छाशक्ती मुळे होऊ शकले आहे हे निर्विवाद सत्य आहे. या पालखी मार्गामुळे वारकऱ्यांची वारी सुखदायक होत आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गासाठी सोलापूर जिल्ह्यात केंद्र शासनाने सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग मोहोळ ते पंढरपूर वाखरी ७३१ कोटी वाखरीचे खडूस ३६३ कोटी, खुडूस ते धर्मपुरी ५९५ कोटी, आणि वाखरीपासून श्री विठ्ठल मंदिरापर्यंतचा शहरातील संपूर्ण रस्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष बाब म्हणून नॅशनल हायवे दर्जाचा मंजूर केला असून हे काम येणाऱ्या आषाढी वारीपर्यंत पूर्ण होईल. या कामासाठी सुमारे ९० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

मोहोळ ते धर्मपुरी जिल्ह्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची लांबी ११७ किलोमीटर आहे.संत तुकाराम महाराजांच्या पालखी महामार्गासाठी सुमारे २५० ते ३०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.हा चार पदरी रोड आणि ज्या गाव ज्या गावातून रस्ता जातो तेथे सर्विस रोड तसेच इतर ठिकाणी एक लेन वारकऱ्यांना पायी चालण्यासाठी तयार केलेला आहे. बहुतेक सर्व कामे पूर्णत्वाकडे असून किरकोळ कामे बाकी आहेत.

दुभाजक व सर्विस रोडवर लाइट व दुभाजकांमध्ये आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात स्थानिक व झाडांची लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखलेला आहे. उड्डाण पुलावर अत्याधुनिक विद्युत खांब उभा करून विद्युत बल्ब बसवले आहेत.

लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्गाची गरज कै. वसंतदादा पाटील, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आळंदी येथे पालखी महामार्गाचे सुमारे ५० वर्षांपूर्वी भूमिपूजन केले होते. परंतु राज्य सरकारच्या आर्थिक बजेट मुळे या कामाला मर्यादा होती. परंतु केंद्रात नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी आल्यामुळे पालखी महामार्ग वारकऱ्यांना पाहिजे तसा होऊ शकला. या भागातून सुमारे ११५ वर्षापूर्वी मंजूर असलेला लोणंद फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग अद्याप होणे बाकी आहे, तो होणे गरजेचे आहे.

इतका झाला खर्च

  • श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गासाठी ६२६.३७ कोटी

  • जगद्‍गुरू तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी ३३३.४७ कोटी

  • एकूण ९५८.८४ कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर निधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT