Simultaneous liquidation of 61 co operative societies in Pandharpur taluka
Simultaneous liquidation of 61 co operative societies in Pandharpur taluka 
सोलापूर

पंढरपूर तालुक्‍यातील सहकारी संस्थांना घरघर; एकाचवेळी 61 संस्था अवसायानात 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंत असे बिरुद मिरणाऱ्या अनेक सहकारी संस्था अवसायानात निघू लागल्या आहेत. गैरव्यवस्थापन, संस्थापक आणि संचालक मंडळाची उदासिनता अशा विविध कारणांमुळे सहकारी संस्था मोडीत निघत आहेत. शासकीय निकष पूर्ण करु शकत नसलेल्या पंढरपूर तालुक्‍यातील 61 सहकारी संस्था निबंधक कार्यालयाने अवसायानात काढल्या आहेत. यामध्ये तालुका देखरेख संघाचाही समावेश आहे. येत्या महिनाभरात या संस्थांनी निकष पूर्ण केले नाहीत तर या संस्था मोडीत निघणार आहेत. 

पंढरपूर शहर व तालुक्‍यात सहकारी साखर कारखाने, बॅंका, पंतसंस्था, गृहनिर्माण संस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, दूध संस्थांसह 490 सहकारी संस्थांचे जाळे पसरले आहे. अलीकडे सहकारी संस्थांमधील अनियमीत, गैरव्यवस्थापन, संचालक मंडळाचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमुळे ग्रामीण पत संस्था, दूध डेअरी, गृहनिर्माण अशा अनेक संस्था मागील अनेक वर्षापासून बंद आहेत. 

कामकाज बंद असलेल्या अशा तालुक्‍यातील 61 सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करुन अवसायानात काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या संबंधीत सहकारी संस्थांना येथील सहाय्यक कार्यालयाने अंतिम नोटीस देवून कार्यअहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.25 नोव्हेंबर पर्यंत अहवाल न दिल्यास संबंधीत संस्थांची नोंदणी रद्द करुन अवसायानात काढण्यात येईल असे नमूद केले आहे. एकूणच तालुक्‍यातील ग्रामीण आणि शहरी भागातील अशा अनेक संस्थांना घर घऱ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

पंढरपूर येथील सहाय्यक निबंधक एम. एस. तांदळे यांनी सांगितले, की पंढरपूर तालुक्‍यातील कामकाज बंद असलेल्या 61 विविध सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. संबंधीत संस्थांनी 25 नोव्हेंबर पर्यंत संस्थांचा कार्य अहवाल देणे आवश्‍यक आहे. त्यानंतर मात्र संबंधीत संस्थांची नोंदणी करुन त्या कायम स्वरुपी बंद केल्या जाणार आहेत. 
 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT