आमदार संजय शिंदे eSakal
सोलापूर

Solapur : करमाळ्यातील रस्त्यांसाठी ६८ कोटी; आमदार शिंदे, हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी तरतूद

करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस

सकाळ डिजिटल टीम

करमाळा : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये करमाळा मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग यासह तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी ६८ कोटी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली

आमदार शिंदे यांनी सांगितले, की मंजूर निधीमधून महसूल विभागातील आठ मंडल अधिकारी कार्यालये व २० तलाठी कार्यालयांची बांधकामे करण्यासाठी चार कोटी २० लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पारेवाडी ते वाशिंबे रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे तीन कोटी ४७ लाख, कुगाव- चिखलठाण -शेटफळ- जेऊर रस्ता चार कोटी ९० लाख, पांडे- शेलगाव (क)- घोटी- केम रस्ता दोन कोटी, कोर्टी- दिवेगव्हाण- पारेवाडी रेल्वे स्टेशन रस्ता तीन कोटी, रायगाव- वीट- झरे- पोफळज- केडगाव रस्ता एक कोटी, मिरगव्हाण- अर्जुननगर-शेलगाव (क)- सौंदे- वरकटणे रस्ता एक कोटी, बोरगाव- करंजे- मिरगव्हाण- निमगाव- नेरले- वरकुटे रस्ता एक कोटी, वांगी नं. २ ते इजिमा १२ रस्ता दोन कोटी, फिसरे- हिसरे- हिवरे ते कोळगाव रस्ता दोन कोटी, केत्तूर २ ते केत्तूर १- वाशिंबे- सोगाव रस्ता रुंदीकरण सात कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

तसेच मांजरगाव- कोर्टी ते जिल्हा हद्द रस्ता पाच कोटी, केत्तूर २ ते केत्तूर १- वाशिंबे- सोगाव रस्ता पाच कोटी, उमरड ते कोठावळे धनगरवाडी रस्ता एक कोटी, सोगाव ते प्रजिमा क्र. ३ रस्ता एक कोटी ७० लाख असा तब्बल ४१ कोटींचा निधी करमाळा तालुक्यातील रस्ते विकासासाठी मंजूर झाला असून, करमाळा मतदारसंघाला जोडलेल्या ३६ गावांसाठी २३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीमधून कव्हे- लहू- म्हैसगाव रस्ता दोन कोटी ७० लाख, रोपळे (क)- वडशिवणे ते कंदर रस्ता दोन कोटी ७० लाख, जिल्हा हद्द ते रिधोरे- तांदूळवाडी- सुलतानपूर रस्ता दोन कोटी ४० लाख, अकोले खुर्द- कन्हेरगाव- निमगाव- ढवळस रस्ता दोन कोटी, वडाचीवाडी ते सापटणे रस्ता एक कोटी ५० लाख, वडाचीवाडी ते शिंदेवाडी रस्ता एक कोटी ८० लाख, पिंपरी दोन कोटी, निमगाव ते उपळवटे पाच कोटी, रोपळे ते मुंगशी रस्ता ८० लाख, कव्हे ते शिंगेवाडी रस्ता एक कोटी, रोपळे- बिटरगाव- शिंगेवाडी रस्ता एक कोटी २० लाख अशी निधीची तरतूद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: ''जेवढी ताकद आहे तेवढी वापरा..'' कोर्टाने दिलेली वेळ संपल्यानंतर बच्चू कडूंची भूमिका

Latest Marathi News Live Update : आम्हाला अटक करावीच लागणार - कडू

अखेर अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या कृष्ण रूपाच रहस्य समोर; का घेतलेलं अभिनेत्रीने श्रीकृष्णाचं रूप?

Heart Health Tips: हृदय राहील कायम निरोगी, फक्त जीवनशैलीत करा हे ५ छोटे बदल!

काही असतात सल्लागार तर काहींकडे भविष्य जाणण्याची ताकद ! जन्मनक्षत्रानुसार जाणून घ्या तुमचं Hidden Talent (भाग 1)

SCROLL FOR NEXT