teacher
teacher sakal
सोलापूर

सोलापूर : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे ठरले वेळापत्रक! 13 ऑगस्टला

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार यंदा शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पार पाडली आहे. तांत्रिक अडचणींमुळे बदलीसाठी विलंब झाला आहे. आता आंतरजिल्हा बदल्यांचे वेळापत्रक अंतिम झाले असून, २ ते १३ ऑगस्ट या काळात बदली प्रक्रिया उरकली जाणार आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रियेत वशिलेबाजी चालत होती. शिक्षकांच्या तक्रारीनंतर ग्रामविकास विभागाने ७ एप्रिल २०२१ रोजी बदली प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. मेअखेर पूर्ण होणारी प्रक्रिया अजूनही सुरु झाली नव्हती. शाळा सुरु होण्यापूर्वी बदली झालेले शिक्षक नवीन शाळेवर रुजू व्हायचे. पण, ऑनलाइन प्रक्रियेत सुरवातीपासून तांत्रिक अडचणी आल्या. आता बदलीसाठी पात्र शिक्षकांची त्या संकेतस्थळावर माहिती भरली आहे. उद्यापासून (मंगळवारी) बुधवारपर्यंत (ता. ३) शिक्षकांचे रोस्टर त्यावर अपलोड केले जाणार आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचे वेळापत्रक आज (सोमवारी) ग्रामविकास विभागाचे उपसचिव के. जी. वळवी यांनी जाहीर केले. शिक्षक बदलीचा तीन महिन्यांपासून प्रलंबित राहिलेला विषय आता मार्गी लागणार आहे.

अडथळा आल्यास लांबणार प्रक्रिया

शाळा सुरु होऊन दीड महिने होऊनही बदली न झालेल्या शिक्षकांना आता नवीन शाळांचे वेध लागले आहेत. त्यांना बदलीसाठी अर्ज करायला केवळ चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ६ ते ९ ऑगस्ट या कालावधीत त्यांना बदलीसाठी अर्ज करावे लागणार आहेत. राज्यातील तब्बल एक लाखांहून अधिक शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत. मात्र, अर्ज केल्यानंतर तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यास काही दिवस पुन्हा बदली प्रक्रिया लांबणीवर पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, असेही ग्रामविकास विभागातील सूत्रांनी सांगितले.

असे आहे वेळापत्रक...

रोस्टर अपलोड करणे : २ ते ३ ऑगस्ट

बिंदुनामावली प्रसिध्द : ४ ते ५ ऑगस्ट

आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज : ६ ते ९ ऑगस्ट

बदलीची कार्यवाही : १० ते १२ ऑगस्ट

बदलीचे आदेश : १३ ऑगस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT