प्रमोदिनी हिरळीकर
प्रमोदिनी हिरळीकर  sakal
सोलापूर

सोलापूर : पतीला किडनी देऊन जपली आधुनिक सावित्रीची भूमिका

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पती-पत्नीचे नाते सात जन्म टिकावे, यासाठी वटपौर्णिमेच्या सणाला अधिक महत्त्व आहे. सत्यवान-सावित्रीचे उदाहरण अनेक वर्षांपासून सांगितले जाते. पती-पत्नीच्या नात्याला अधिक घट्ट बांधून ठेवणारी अनेक उदाहरणे समाजात आहेत. प्रमोदिनी हिरळीकर यांनी असेच एक उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. त्यांचे पती संजय हिरळीकर यांच्या दोन्ही किडन्या कमकुवत झाल्या. पतीला जीवनदान देण्यासाठी प्रमोदिनी हिरळीकर यांनी स्वत:ची एक किडनी देऊन आधुनिक सावित्रीची भूमिका वठविली आहे. हिरळीकर दाम्पत्य आज एकाच किडनीवर जगत आहेत. दोघांना जरी किडनी एकच असली तरीही त्यांच्यातील प्रेम मात्र अमर्यादित आहे.

सौ. प्रमोदिनी या सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अधिपरिचारिका आहेत तर संजय हिरळीकर हे व्यावसायिक आहेत. १९९८ मध्ये त्यांचा विवाह झाला. २००८ मध्ये संजय हिरळीकर यांना मुतखड्याचा त्रास सुरू झाला. त्यांच्या किडनीत तब्बल १.५ सेंटिमीटरचा खडा होता. मुतखड्यामुळे संजय यांची डावी किडनी लहान झाली. तीन ते चार शस्त्रक्रिया झाल्या. डायलेसिसवर त्यांनी २ वर्षे काढली. किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पतीला स्वत:ची किडनी देण्यासाठी प्रमोदिनी यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. २०१९ मध्ये प्रमोदिनी यांची किडनी संजय यांना बसविण्यात आली.

११ आॕक्टोबरला माझा पुनर्जन्म झाला. माझ्या अर्धांगिनीने नवसंजीवनीच दिली. अर्धांगिनी म्हणजे अर्धं अंग. मला पूर्ण अंग समर्पित करून माझी अर्धांगिनी आधुनिक सावित्री झाली. मी सत्यवान आहे की नाही हे माहिती नाही, परंतु माझ्यासाठी ती सावित्रीच आहे. मी आज उभा आहे, फक्त माझ्या सौभाग्यवतीच्या त्यागामुळेच.

- संजय हिरळीकर

वटवृक्षाची पूजा धार्मिक आहे. धार्मिक भावना ज्याने त्याने जपल्या पाहिजेत. पती-पत्नीच्या संसारात दोघांनी एकामेकांना मनापासून साथ देणे महत्त्वाचे असते. नुसते बोलून दाखविण्यापेक्षा त्याग, निष्ठा आणि प्रेम या गोष्टी कृतीतून दाखवून एकामेकांना साथ देणे आवश्‍यक आहे.

- प्रमोदिनी हिरळीकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT