solapur monsoon session MLA not mention anything regarding illegal dance bars
solapur monsoon session MLA not mention anything regarding illegal dance bars Esakal
सोलापूर

Solapur Dance Bar : बेकायदा डान्सबारप्रकरणी जिल्ह्यातील आमदारांचे ‘मौन’

सकाळ वृत्तसेवा

- शिवाजी भोसले

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यात बिनधास्तपणे सुरु असलेल्या बेकायदा डान्सबारप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराने राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तोंड उघडले नाही.

याप्रकरणी सर्वच लोकप्रतिनिधींचे ‘मौन’ दिसले. डान्सबार संस्कृतीचे या जिल्ह्यावर वाईट परिणाम उमटत असतानादेखील संवदेनशीलता न दाखविता मुग गिळून गप्प राहणेच आमदारांनी पसंद केल्याचे लपून राहिले नाही. सोलापूर शहर-जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्‍नावर जिल्ह्यातील सगळेच आमदार मौनीबाबा ठरले.

सोलापूर शहर अन्‌ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साधारण १७-१८ बेकायदा डान्सबार चालत आहेत. हे डान्सबार चालविण्याला परवाने नाहीत. ऑर्केस्ट्राबार पर्यायाने लाईव्ह ऑर्केस्ट्राबारच्या नावाखाली येथे राजरोसपणे डान्सबार चालविले जात आहेत.

डान्सबारमुळे तरूणाई बरबाद होऊन भीकेकंगाल होत आहे. कित्येकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. डान्सबारमधून मद्यप्राशन करुन घराकडे परतत असताना कैकांना अपघात आपला जीव गमावावा लागला. कित्येकजण अपघातात कायमचे जायबंदी झाले.

विशेषत्वे, डान्सबारच्या नादाला लागून कर्जबाजारी झालेल्या काहींना सावकारांच्या जाचाला कंटाळून गाव सोडून जाणे भाग पडले. तर काहीजणांनी आत्महत्या करुन या जगाचा कायमच निरोप घेतला. डान्सबारच्या नादाला लागून बरबाद होत असलेल्या अनेक तरुणांचे संसार मोडले. कैकांच्या पत्नी त्यांना सोडून माहेरी राहायला गेले.

वास्तविक सोलापुरात नव्याने उद्योग-धंदे येत नाहीत. बेरोजगारीचा प्रश्‍न मोठा आहे. तरुणाईच्या हाताला काम नाही, अशात डान्सबारच्या नादाला लागून नवी पिढी बरबाद होत आहे. या संदर्भातील वास्तव जागल्याची भूमिका ठेवणाऱ्या ‘सकाळ’ने समोर आणले. डान्सबारच्या विरोधात मोहीम उघडली. या मोहीमेला संवदेशील लोकप्रतिनिधी साथ देतील. पावसाळी अधिवेशनात आवाज उठवतील असे तमाम सोलापूरकरांना अभिप्रेत होते.

मात्र, जिल्ह्यातील एकाही बहाद्दर आमदाराने सोलापुरच्या या ज्वलंत प्रश्‍नावर साधा ब्र शब्द काढला नाही. यासंबंधित लोकप्रतिनिधींच्या असंवदेशीलतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वाचा बेकायदा डान्सबारचा विषय वगळला

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सिध्देश्‍वर साखर कारखान्याची चिमणी, होटगी रस्त्यावरील विमानसेवा, बोरामणी विमानतळाचा प्रश्‍न, माळढोक, कामगार कल्याण मंडळ, सोलापूरचा पाणीपुरवठा, सार्वजनिक नळ, जिल्ह्यातील केळी संशोधन केंद्र, महिला रुग्णालय सुरु करणे, निर्यात सुविधा केंद्रात सोलापूर जिल्ह्याचा समावेश करणे,

महात्मा जोतिबा फुले कर्ज योजना सात बारा उताऱ्यावरील बोजा कमी करणे, जलजीवन मशिनचा कारभरा,भिडे समर्थकांवर हल्ला आदींवर जिल्ह्यातील काही आमदारांनी आवाज उठवला. पण अनेक महिलांचे संसार देशोधडीला लागण्यास कारणीभूत असलेल्या आणि सोलापूर जिल्ह्याच्यादृष्टीने सामाजिक चिंता वाढविणारा डान्सबारचा विषय मात्र सर्वच आमदारांनी बाजूला ठेवला.

आमदार प्रणिती शिंदेंकडून अपेक्षा होती पण...

आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूरचं आश्‍वासक नेतृत्व मानलं जातं. सोलापूरबद्दलचे विषय त्या मोठ्या तडफेने मांडतात. कामगार, वंचित, गोरगरीब तसेच महिलांच्या विषयांना त्या प्राधान्य देतात.

या पार्श्वभूमीवर, महिलांसंबंधित आणि एकूण सोलापूर शहर-जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या डान्सबारच्या विषयावर संवदेशील महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्या आवाज उठवतील, याबद्दल सर्वांना खात्री होती. तथापि, प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर-जिल्ह्याच्या अनेक प्रश्‍नांवर अधिवेशनात आवाज उठविला.

पण या जिल्ह्याच्या समाजमनाशी संबंधित डान्सबारच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर अनेक लोकप्रतिनिधींप्रमाणे त्यांनीदेखील मौनव्रत स्विकारले. वास्तविक पाहता त्या विरोधी पक्षाच्या जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणून विधीमंडळात होत्या, त्यांनी हा विषय हाताळणे अत्यंत महत्वाचे होतेच होते. तशी त्यांना संधी होती. त्यांनी ती गमावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT