सोलापूर

`या` शहरातील सावित्रीच्या लेकींना मिळणार मोफत सायकली

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाचवी ते 12 वीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महिला व मुलींच्या विविध स्पर्धा घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. 

समितीच्या सभापती कुमुद अंकाराम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेले सहाही विषय तातडीने दाखल करण्यात आले. समितीच्या वतीने मुली व बालकांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यास अनुसरून आर्थिक दुर्बल घटकातील मुलींसाठी सायकली उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातील मुली व महिलांसाठी राज्यस्तरीय क्रिकेट, कबड्डी, खो-खो लॉन टेनिस व इतर स्पर्धांचेही आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

समितीच्या सदस्या निर्मला तांबे यांच्या प्रभागात स्वच्छतागृह बांधणे, गर्दीच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे ही कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. शिवणवर्गाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुली व महिलांना शिवणयंत्र देण्याचा ठरावही या सभेत करण्यात आला. महापालिकेच्या विविध उद्यानात खेळाचे साहित्य नाही. त्या ठिकाणी खेळाचे साहित्य बसविण्यास मंजुरी देण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या अंदाजपत्रकात मुली व महिलांसाठी जितक्‍या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत, त्या सर्व राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT