Rail
Rail  sakal
सोलापूर

सोलापूर : प्रवाशांच्या मदतीला स्थानकावर ‘रेल कर्मयोगी’

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासापूर्वीच रेल्वे तिकिटापासून ते बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. रेल्वे स्थानकात आरक्षित तिकीट काढण्यासाठी गेल्यास आरक्षणाचा फॉर्म कसा भरायचा ते माहीत नसते. रेल्वेची वाट पाहात असताना गाडी नेमकी कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, हेही अनेकदा माहीत नसते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांची ही गैरसोय आणि समस्या दूर करण्यासाठी सोलापूर रेल्वे विभागाने कर्मचाऱ्यांना ‘रेल कर्मयोगी’चे प्रशिक्षण दिले असून, येत्या काळात या मोहिमेनुसार रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘रेल कर्मयोगी’ मदत करणार आहेत.

लखनौ स्थित इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंटला (आयआरआयटीएम) रेल कर्मयोगी प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. या ठिकाणी विभागातील १५ जणांचे मास्टर ट्रेनिंग झाले असून, हे मास्टर ट्रेनर विभागातील इतर कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देत आहेत. या मोहिमेअंतर्गत एक व्यक्ती प्रवाशांच्या मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी उभा राहणार आहे. ही व्यक्ती म्हणजेच ‘रेल कर्मयोगी’, रेल्वेशी संबंधित समस्या सोडवणार आहे. तसेच, प्रवाशांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. रेल्वे कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल, आपल्याला हवा असलेला डबा कुठे असेल, आदी माहिती देणार आहे. सोलापूर स्थानकावर प्रवाशांच्या मदतीसाठी ‘रेल कर्मयोगी’ लवकरच तैनात करण्यात येणार आहेत. या मोहिमेअंतर्गत हे कर्मयोगी रेल्वे प्रवासी किंवा रेल्वेशी व्यावसायिक संबंध असलेल्या लोकांचा अनुभव आणखी सुधारणार आहेत.

ठळक बाबी...

प्रवाशांसाठी रेल्वेचा नवा उपक्रम

रेल्वेतील प्रत्येक अडचणीतून मिळणार दिलासा

आता रेल्वे कर्मचारी जाब विचारणार आहेत

प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात हा या योजनेचा मुख्य उद्देश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT