esakal
esakal
सोलापूर

सोलापूरचा कापड उद्योग पुन्हा संकटात

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : कापड उद्योग जीएसटीवाढीच्या संकटातून कसाबसा वाचला असताना आता महागाई, कमोडिटी, कापूस निर्यात या नव्या संकटात हा उद्योग सापडला आहे. या स्थितीत केंद्र शासनाने एंड प्रॉडक्टच्या निर्यातीला संरक्षण देणे व सुताच्या आयात- निर्यातीच्या सकारात्मक धोरणासाठी हस्तक्षेप करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.शहरातील कापड निर्मितीमध्ये रेडिमेड गारमेंटची विक्री ही प्राधान्याने देशांतर्गत बाजारपेठेशी निगडित झाली आहे. तर टेरी टॉवेलसारख्या वस्तूंची निर्मिती ही निर्यातीशी जोडलेली आहे. या दोन्ही उद्योगांना सुताच्या दरवाढीचा फटका बसला आहे.

कारखानदारांनी सुरवातीला कपडे, टेरी टॉवेल्स पुरवठ्याचे करार हे कच्च्या मालाचे भाव वाढल्याने तोट्यात गेले आहेत. पण नवे करार करण्याच्या आधी पूर्वी केलेल्या करारानुसार उत्पदनांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. सुताचे भाव अडीच पटीने वाढल्याने जुन्या ऑर्डरी तोट्यात करण्याची वेळ आली आहे. या स्थितीत सुताचा पुरवठा तामिळनाडूमधून व इतर राज्यांतून कमी प्रमाणात होतो आहे. त्यामुळे कारखानदारांच्या अडचणीत भर पडत चालली आहे. पुरेसा कच्चा माल नसल्याने काही कामाच्या शिफ्ट कमी करण्याची वेळ आली आहे.

घटना व त्यांचे परिणाम अपेक्षित उपाययोजना

  • कापसाचा कमोडिटीमध्ये समावेश : कमोडिटीमुळे दररोज वायदे बाजाराप्रमाणे सतत दरात चढ-उताराने खरेदीचा वाढला संभ्रम.कापसाचा समावेश कमोडिटीमधून काढून घ्यावा

  • सुताचे वाढलेले दर : सुताचे दर अचानक वाढल्याने आधी घेतलेल्या ऑर्डरीचे उत्पादन तोट्यात विकण्याची वेळ.शासनाकडून प्रोत्साहन निधी मिळावा

  • आयातीचे धोरण : आयात सुतावर अधिक कर बसवल्याने कमी दराचे सूत मिळण्याचा मार्ग झाला बंद.आयात कर कमी करून सुताची आयात करावी

  • निर्यात धोरण : कापड उद्योगात एंड प्रॉडक्ट म्हणजे विक्रीसाठीचे तयार कपड्याच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळेना.एंड प्रॉडक्ट निर्यातीचे धोरण ठरावे

  • सुताचा पुरवठा : स्थानिक उद्योगाला ६५ टक्के पुरवठा तमिळनाडूतून होतो पण हा पुरवठा ८० टक्केच होतो.आयात सुताची उपलब्धता व्हावी

  • पाकिस्तानमधील अशांतता : टेरी टॉवेल उत्पादनाचा स्पर्धक पाकिस्तान असल्याने टेरी टॉवेल निर्यातीची संधी.केंद्र शासनाने संधीचा लाभ उठवण्यासाठी आढावा घेण्याची गरज कापड निर्मिती उद्योगाबाबत एकात्मक पद्धतीने अभ्यास करून केंद्र शासनाने कारखानदारांच्याअडचणी,आंतरराष्ट्रीय स्थिती याचा आढावा घेऊन देशाच्या वस्त्रसाखळीचे संरक्षण करण्याची गरज आहे.

- पेंटप्पा गड्डम,

अध्यक्ष, जिल्हा यंत्रमागधारक संघ, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT