Solapur Weather Update  Hospitals crowded due abnormal temperature viral diseases
Solapur Weather Update Hospitals crowded due abnormal temperature viral diseases sakal
सोलापूर

Solapur Weather Update : विषम तापमानामुळे रुग्णालयांत गर्दी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर परिसरात सकाळी कडाक्याची थंडी व नंतर कडक ऊन या विषम तापमानामुळे विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे.

मागील पंधरवड्यापासून वातावरणातील बदल अधिक प्रभावीपणे जाणवू लागला आहे. सकाळच्या वेळी वॉकिंगसाठी चालणाऱ्यांना थंड बोचऱ्या वाऱ्याचा त्रास होऊ लागला आहे. तसेच मध्यरात्रीनंतर किमान तापमानातील घट देखील मोठी आहे.

या उलट दिवसभरातील तापमानाची स्थिती आहे. सकाळी ८ नंतर उन्हाचा पारा वाढू लागला आहे. दुपारी तर अगदी कडाक्याच्या उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. या सर्व प्रकारात शहरात धुळीच्या त्रासाची भर पडू लागली आहे.

शहरातील रस्त्याची अर्धवट कामे, वाहनांची गर्दी, कारखान्याचा धूर या प्रकारामुळे श्वासाचे विकार वाढीस लागले आहेत. रस्त्यावरून एक वाहन गेले की धुळीचा लोट उठून परिसरातील नागरिकांच्या नाकातोंडात जातो.

या प्रकारामुळे तापीचे रुग्ण वाढीस लागले आहेत. पाच ते सात दिवसाचा ताप येण्याचे प्रकार दिसून येत आहे. त्यासोबत खोकल्याचे रुग्ण देखील वाढीस लागले आहेत. कोरड्या खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यासोबत सर्दीचा त्रास वाढला आहे.

आजाराचे प्रकार

  • कारण समजू न शकणारे तापाचे प्रकार (पायरेक्झीया ऑप अननोन ओरीजीन)

  • सतत होणारी सर्दी

  • गळ्याचे संसर्गजन्य आजार (थ्रोट इन्फेक्शन)

  • कोरडा खोकला

  • धुळीमुळे होणारे आजार

तापमानातील बदल

  • सकाळी बाहेर पडल्यानंतर थंडगार बोचरे वारे

  • दुपारी कडक उन्हाचा त्रास

  • धुळीचा वाढलेला त्रास

  • विषम तपमान किंवा तापमानातील वाढत्या फरकाचा परिणाम

कमाल व किमान तापमानाच्या नोंदी

(अंश सेल्सियसमध्ये)

  • ता. १० - ३६ व १६.२

  • ता. ११ - ३६.६ व १६.३

  • ता. १२ - ३२.७ व १६.६

  • ता. १३ - ३५.६ व १६.५

  • ता. १४ - ३५.७ व १४.४

  • ता. १५ - ३७.२ व १४.४\

सद्यस्थितीत तापमानातील बदलाचे परिणाम दिसत आहेत. सर्दी, खोकला व तापाचे प्रकार वाढतात. चक्कर येणे, मळमळ, अस्वस्थता ही लक्षणे दिसली तर डॉक्टरांकडे जावे. शिळ्या अन्नामुळे विषबाधेची शक्यता पाहता फक्त ताजे अन्न खावे. शरिरातील पाण्याची पातळी योग्य ठेवावी. त्वचेवर पुरळ किंवा ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. फुलांतील परागकण हवेत अधिक पसरल्याने ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. डासांपासून होणारे आजार देखील वाढतात.  

- डॉ. अभिजित बुबने, रुबी नगर, जुळे सोलापूर

तापमानातील फरकामुळे सध्या सर्दी, ताप व खोकल्याचे रुग्ण वाढत चालले आहेत. या काळात तापमान समजून घेऊन काळजी घ्यावी. तसेच फ्रीजमधील थंड पदार्थ व शीतपेये पिणे देखील पूर्णपणे टाळावीत.

- डॉ. ज्योती मोकाशी, भवानी पेठ, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT