लालपरी
लालपरी sakal
सोलापूर

सोलापूर : २६ दिवसात ६१ लाख किमी धावली लालपरी

विजय थोरात

सोलापूर - राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पाच महिन्याच्या संपानंतर सोलापूर विभागात लालपरीच्या चाकांनी गती घेतली आहे. सुट्टी आणि लग्नसराईमुळे एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. संपानंतर सोलापूर विभागाच्या ९ आगारामधून मागील २६ दिवसात ६० लाख ४१ हजार किलोमीटरचा प्रवास करीत लालपरीने सुमारे १९ कोटी ८१ लाख रुपये उत्पन्न मिळविले आहे.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे एसटी ठप्प झाली होती. त्यानंतर दिवाळीच्या मोसमात कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले. त्यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला. संपापूर्वी दररोज बसच्या १५०० ते १७०० फेऱ्या होत होत्या. मात्र, उन्हाळा सुट्टी आणि लग्नसराई असल्याने यामध्ये वाढ होऊन एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सोलापूर विभागातील ९ आगार प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. एसटीने जास्तीत-जास्त प्रवाशांनी प्रवास करावा आणि उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रवासी मित्र योजना देखील राबविली जात आहे. त्यामुळे आगामी काळात यामध्ये वाढ होईल असा विश्वास देखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

एकूण प्रवाशांनी केला प्रवास

२१ लाख २३ हजार

एकूण किलोमीटर

६० लाख ४१ हजार

एकूण उत्पन्न

१९ कोटी ८१ लाख

धावणाऱ्या गाड्या ६२५

दिवसाला २३०० फेऱ्या

तब्बल एसटी कर्मचाऱ्यांच्या पाच महिन्याच्या संपानंतर लालपरीने पुन्हा गती घेतली आहे. सध्या ६२५ बसद्वारे दिवसाला २ हजार ३०० फेऱ्या होत आहेत. आगामी काळात यामध्ये वाढ होणार असून, उत्पन्नामध्ये कमालीची वाढ होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिवाळी सुट्टीत सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर २२ एप्रिलपासून पूर्ण क्षमतेने एसटी धावू लागली. त्यामुळे दिवाळीचा हंगाम पूर्णत: वाया गेल्याने उन्हाळा सुट्टी आणि लग्नसराईमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यानंतर प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT