sugarcane workers in mohol disease cure farmer health solapur
sugarcane workers in mohol disease cure farmer health solapur Sakal
सोलापूर

Solapur News : ऊस तोडणी टोळयांची मोहोळ तालुक्यात मग्रुरी; रोगा पेक्षा इलाज भयंकर,अशी शेतकऱ्यांची अवस्था

राजकुमार शहा

मोहोळ : ऊस तोडणी साठी एकरी 3 हजार रुपये द्या, 10 किलो चिकन द्या, ड्रायव्हरला प्रत्येक खेपेला 200 रुपये एंट्री द्या, त्याला जेवण द्या, दक्षिणा ठेवा हे नाही केल्यास आम्ही चाललो दुसरीकडे.हा ऊस आम्हाला तोडणे होत नाही.

ही मग्रुरीची भाषा आहे ऊस तोडणी टोळ्यांची. "रोगापेक्षा इलाज भयंकर" अशी अवस्था मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. यापुढे कारखाना प्रशासन ही हातबल झाले असुन त्यांची या बाबत "हाताची घडी तोंडावर बोट' अशी भूमिका आहे.

सध्या तालुक्यातील भीमा, जकराया, लोकनेते व आष्टी शुगर या साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम मध्यावर आला आहे. चालू वर्षी पाऊस न झाल्याने ऊसाची वाढ झालीच नाही. त्यामुळे वजनात मोठी घट झाली आहे.

लागणी च्या उसाला एकरी सरासरी 40 टन तर खोडव्याला 20 ते 25 टन उतारा बसत आहे. पाण्याअभावी अनेक उसाचे फड "बचार" झाले आहेत. तर ऊसाला सुपारीच्या वेलींनी वेढले आहे. चालू वर्षी ऊसाची उपलब्धता कमी असल्याने व ऊस दरा ची स्पर्धा सुरू झाल्याने बऱ्यापैकी उसाचे पैसे होत आहेत.

गाळप हंगाम थोड्या दिवस चालणार म्हणून अनेक ऊस तोडणी कामगारांनी मुकादमा कडुन उचल घेतली नाही. उचल नाही फिटली तर पैसे द्यावयाचे कशाने या भीतीपोटी कामगारांनी पैसे घेतले नाहीत. ऊस तोडणी साठी चीटबॉय ने टोळीला एखाद्या शेतकऱ्याचा फड दाखविला तर अगोदर त्या फडाच्या भोवती गोल फिरून पाहणी करून येतात.

आल्यानंतर त्या ऊसातील शेतकऱ्याला दोष सांगतात जेणे करून ऊस तोडणी साठी जादा पैसे मिळतील. बहुतांश टोळया परभणी, बीड, अमरावती, यवतमाळ या भागातील असल्याने त्यांच्या बोली भाषेत काय बोलतात हे शेतकरी व चिटबॉय ला समजत नाही.

अखेर टोळी व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून चीटबॉय यावर कसातरी मार्ग काढून ऊस तोडणीस प्रारंभ करताना दिसत आहेत. पाऊस नसल्याने ऊसाची वाढ झाली नाही, पाणी नाही त्यामुळे व ऊस तोडणी टोळ्यांचा होणारा त्रास यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस मोडला आहे.

एखादी टोळी आडमुट असेल तर ती शेती अधिकारी व चीटबॉय ला ही जुमानत नाही. चालू वर्षी "को. 265" या वाणा च्या ऊसाला टोळया प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान ऊस तोडणी कामगारांची समस्या वरचे वर गंभीर होत चालल्याने 100 टक्के ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडणी करून गाळप हंगाम यशस्वी करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील मांजरा साखर कारखान्याला अनगर ता मोहोळ येथील "लोकनेते" शुगरचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी कारखान्यातील निवडक अधिकाऱ्या समवेत पाहणी केली व पुढील हंगामात जास्तीत जास्त ऊस तोडणी यंत्राद्वारे करण्याचा मानस असल्याचे सांगितले. त्यासाठी कारखाना ऊस तोडणी यंत्रेदी खरेदी करणार आहे.

चालू वर्षी ऊस तोडणी अत्यंत अडचणीची झाली आहे. यंत्रणा कमी आल्याने आम्ही सुद्धा हतबल झालो आहोत. टोळ्यांना जरा प्रेशर करून काही बोलले तर गबाळ घेऊन रातोरात निघून जातात. कुणाचेही ऐकत नाहीत. याचा फटका मलाही बसला आहे. त्यामुळे चालू वर्षी कसातरी हंगाम पार पाडून शेतकऱ्यांना यातून बाहेर काढणे गरजेचे आहे.

- विक्रांत पाटीलअध्यक्ष, लोकनेते शुगर अनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT