Ground Empty by Summer Heat
Ground Empty by Summer Heat Sakal
सोलापूर

Solapur Heat : वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे मैदाने ओस; उष्माघाताचा धोका

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - दिवसेंदिवस सोलापुरात उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. त्याचा परिणाम मैदानी खेळांवर होताना पहावयास मिळत आहे. काही वर्गांच्या शालेय वार्षिक परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. वर्षातील सुट्टीचे दोन महिने खेळाडू मैदानाकडे गर्दी करत असल्याचे पाहावयास मिळते, परंतु वाढत्या उन्हामुळे मैदानाकडील कल अगदीच कमी झाला आहे.

उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे मैदाने ओसाड पडली असून घरातील खेळाकडे मुलांचा कल वाढलेला असल्याचे दिसून येतो आहे. एकंदरीत खेळाडू मैदानावर खेळताना दिसत नसल्याचे देखील चित्र पहावयास मिळत आहे.

त्याचप्रमाणे मैदानी खेळाकरिता युवक सायंकाळी बाहेर पडत आहेत, त्याचबरोबर वाढत्या उकाड्यामुळे मैदानी खेळ टाळत मोबाईल गेम, टीव्ही, लॅपटॉप अथवा कॉम्प्युटर ऑनलाइन गेमिंग, बुद्धिबळ, कॅरम याकडे कल वाढत आहे. त्याचबरोबर उन्हामुळे होणारे त्रास तसेच उन्हामुळे होणारे गंभीर आजार या गोष्टी पाहता खेळाडू उतरण्याचा प्रतीक्षेत सायंकाळी घराबाहेर पडत मैदानात जात आहेत.

मैदानामध्ये सकाळी व सायंकाळी खेळाडूंची गर्दी असते इतर खेळाडूंना खेळण्याची संधी मिळत नाही मात्र, दुपारी खेळणाऱ्या खेळाडूंना देखील उन्हामुळे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

बैठ्या खेळाला पसंती

सोलापूर शहरातील काही शालेय वर्गांच्या वार्षिक परीक्षा झाल्या असून, वाढत्या उन्हामुळे बैठे खेळाकडे मुलांचा कल वाढत आहे. तापमानाने चाळिशी पार केल्याने, दिवसभर बाहेर न पडता युवक सायंकाळी घरातून बाहेर पडत असल्याचे सांगण्यात येत आहेत. दुपारी खेळाडू तापलेल्या वातावरणाच्या अभावी कुलर, फॅन अथवा एसी वाऱ्याखाली बसून बैठे खेळाला पसंती देत आहेत.

मैदानातील खेळांना खूप धावपळ करावी लागते, त्यामुळे शरीराची ताकद जास्त असणे गरजेचे आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे गंभीर आजारांना सामोरे जावे लागते आहे. दुपारी मैदानी खेळ खेळाडूंकडून टाळला जात आहे. त्या ठिकाणी वाचन, मोबाईल, टीव्ही याचा वापर अधिक होत आहे. मैदानामध्ये सकाळी अथवा सायंकाळी मैदानी खेळ खेळण्यासाठी गर्दी पडते त्यामुळे जागे अभावी देखील खेळ खेळले जात नाहीत.

- तनिष्क शिंदे, सोलापूर

वार्षिक परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर मैदानी खेळाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, वाढत्या तापमानामुळे हे नियोजन विस्कळित होत असून घरातच वेळ घालवावा लागत आहे. दुपारच्या वेळी मैदान रिकामी असून देखील उन्हामुळे मित्रांकडून खेळायला नकार येत आहे. यामुळे घरामध्येच काही ना काही करत दिवसातील वेळ घरातच घालवावा लागत आहे.

- वीर निकंबे, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT