Sundarrao Jagdale has demanded that corona vaccination should be arranged at Pangri Health Center
Sundarrao Jagdale has demanded that corona vaccination should be arranged at Pangri Health Center 
सोलापूर

पांगरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय करावी

अनिल जोशी

चारे (सोलापूर) : बार्शी तालुक्यातील चारे परिसरातील पिंपळवाडी, शिराळे, पाथरी, धानोर (दगड), कुसळंब, घारी, पुरी या गावांतील ग्रामस्थांसाठी पांगरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय करावी, अशी मागणी बार्शी पंचायत समितीचे गटनेते सुंदरराव जगदाळे यांनी केली.

सध्या आरोग्य विभागाने साठ वर्षांवरील व सह आजार असणाऱ्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोविड 19 या विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरणाची सुरूवात केली आहे. पण वरील गावातील नागरिकांना ही लस सध्या फक्त चिखर्डे आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. लस घेण्यासाठी या ग्रामस्थांना तेथे जाणे गैरसोयीचे आहे. यात लस मोफत असली तरी जाण्या येण्यासाठी वेळ व पैशाचा अपव्यय होतो आहे.

पिंपळवाडी ते चिखर्डे हे अंतर सुमारे चाळीस किमी आहे. तेच पांगरी आरोग्य केंद्र हाकेच्या अंतरावर आहे. अशीच काहीशी परिस्थिती इतरही गावाची आहे. या सर्व गावातील नागरिकांना पांगरी आरोग्य केंद्र मध्यवर्ती ठिकाणी आहे. ग्रामस्थ आठवडा बाजार, शेतीसाठी लागणारे औजारे, खते, बियाणे, किटकनाशके व इतर प्रापंचिक वस्तू खरेदीसाठी पांगरी जात येत असतात. पण या आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय नसल्याने लस घेणे गैरसोयीचे झाले आहे. तरी संबंधितांनी ताबडतोब पांगरी आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय करावी अशी मागणी गटनेते जगदाळे यांनी केली. 

सध्या परिसरात आगळगाव व चिखर्डे आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय आहे. मग पांगरी आरोग्य केंद्र वरील दोन्ही आरोग्य केंद्रा पेक्षा जुने असून या आरोग्य केंद्राचा लौकिक इतर अनेक आरोग्य विषयक योजना राबविण्यात होता. पण कोरोना लसीकरणा बाबत उदासीनता का ?असा सवाल गटनेते सुंदरराव जगदाळे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT