mayur devarmani.jpg
mayur devarmani.jpg 
सोलापूर

रिस्टोरेशनचे टेक्नोसेव्ही तंत्र ठरले यशस्वी

प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः दुचाकी व चारचाकी गाड्यांची देखभाल व त्यांच्या देखभालीच्या समस्याबाबत एक संपुर्ण पर्याय शोधण्याची गरज होती. हा पर्याय संशोधनातून सिध्द करण्याचे आव्हान मयुर देवरमनी या तरुण उद्योजकाने यशस्वीपणे पेलत या बाबत स्वतःच्या टेक्‍नोसर्व्हिसचे तंत्र स्थापित केले. 
मयुर देवरमनी हे सुरवातीला नोकरी करत होते. मात्र आपली क्रिएटीव्हीटी जतन करायची असेल तर नव्या गोष्टीचा अभ्यास करायचा असे त्यांनी ठरवले. त्यांनी मित्रांच्या गाड्या व त्यांची देखभालीचा अभ्यास सुरू केला. या बाबत सध्या अस्तित्वात असलेल्या तंत्राला नवे पर्याय शोधायचे असतील तर स्वतःच आधी अनुभव घेतला पाहिजे हे त्यांनी ठरवले. एका ठिकाणी छोटेसे वर्कशॉप सूरू केले. गाड्या नेमक्‍या देखभालीच्या कोणत्या स्थितीत येतात, त्यांच्या देखभालीचे बाजारातील पेंट, रसायने व सर्व्हिसींगच्या पध्दती त्यांनी अनुभवातून शिकण्यास सुरवात केली. उपलब्ध असलेल्या रसायनाच्या बाबतीत अनेक तांत्रिक मर्यादा असल्याचे दिसून आले. मॅकॅनिकल पध्दतीने सर्व्हिस होणारी गाडी देखील केवळ अल्पसा परिणाम दाखवणारी असते. देखभालीचे वेगवेगळे पर्याय कधी तंत्र तर कधी गुणवत्ता या दोन्ही बाबतीत वेगवेगळे परिणाम दाखवत होते. धुळ, उन व पाणी यामुळे गाड्यांचा लुक व रंग जादा कालावधीत टिकून राहण्यास मोठे अडथळे होते. 
त्यानंतर त्यांनी जर्मनी व अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या काही रसायनांचा अभ्यास सुरू केला. त्यांनी दोन रसायनांचे उपयोग गाडीच्या देखभालीसाठी प्रभावी असल्याचे स्वतः शोधून काढले. गाड्यांच्या रंगाचा टिकाऊपणा वाढवण्याच्या समस्येवर त्यांनी बऱ्यापैकी यश मिळवले. पारंपारिक सर्व्हिसींगच्या पुढे जाऊन रिस्टोअरेशनमध्ये त्यांनी संशोधन सुरू केले. या संशोधनाने त्यांना गाडीच्या रिसेलला मात्र रिस्टोअरेशन तंत्राचा पूर्ण पर्याय निघाला. आरटीओ यंत्रणेकडून या प्रक्रियेसाठी वाहनांना पाच वर्षाची मुदतवाढ नियमाच्या आधिन राहून दिली जाते. तसेच गाडीचे आयुष्यमान वाढून गाडी लगेच विकण्याची गरज भासत नाही. ज्या ग्राहकांचे गाडीशी भावनिक नाते आहे त्यांना त्यांची गाडी चांगल्या स्थितीत टिकवता येते. ज्या दुचाक्‍याचे ऍल्युमिनीयमचे इंजिन बाहेरील भागात असते त्याच्या पृष्टभाग लवकर खराब होण्याच्या समस्येवर देखील त्यांनी कोट आणि बफिंगचा प्रभावी उपाय शोधला. त्यामुळे बुलेट, जावा व यझडी सारख्या गाड्यांचा लुक अधिक चांगला ठेवण्यास मदत झाली. मागील तिन वर्षाचे संशोधन व अभ्यासातून त्यांनी आता स्वतःचे नव्या टेक्‍नोसर्व्हिसचे सेंटर उभारत ऑल सोल्युशन अंडर वन रुफ या पध्दतीने ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. गाड्यांचे पेंट राहण्यासाठी कोटींगचा उपयोग ते करतात. तसेच अपघातात चेपलल्या गाडया सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी डेंटिंग टेक्‍नो सर्व्हिस सुरू केली. चार चाकी गाड्याच्या इंटेरिअरवर देखील काम करण्यास सुरुवात केली. 

 
संशोधनातून मिळालेले फायदे 
- रिस्टोअरेशनमुळे वाहनाचे आयुष्य वाढवणे शक्‍य 
- बाजारपेठेच्या तुलनेत कमी खर्चात संशोधित सेवा 
- एकाच छताखाली वाहनांचे पेटिंग, बफींग, कोटिंग, रिस्टोअरेश टेक्‍नोसर्व्हिस 
- वाहनावरील उन, पाऊस व धुळीचे दुष्परिणाम टाळणे शक्‍य 
- भारतीय वातावरणाचा वाहनावरील दुष्परिणामावर कायमस्वरुपी उपाय 
- गाडी काही वर्षात विकण्याच्या समस्येला कायम उपाय 


मुदत वाढ देण्याचा नियम
गाडी उत्तम स्थितीत असेल तर पंधरा वर्षानंतर गाडीला पाच वर्षे मुदत वाढ देण्याचा नियम आहे. गाडीची तपासणी करून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे गाडीला नियमांचे पालन करून नवीन 
नोंदणी दिली जाते. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT