urdu foram.jpg
urdu foram.jpg 
सोलापूर

सोलापुरात शुक्रवार पासून दहा दिवसीय अशरा-ए- उर्दू महोत्सव 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : येथील खादिमाने उर्दू फोरमतर्फे दहा दिवसीय उर्दू संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार (ता.5) पासून करण्यात आले. या दहा दिवसीय सोहळ्या अनेक साहित्यीक संस्थाच्या संयुक्त विद्यमाने उर्दू भाषा व साहित्यावर भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 
प्रत्येक वर्षी 15 फेब्रवारी हा उर्दू दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याचेच औचित्य साधून खादिमाने उर्दू फोरम सोलापूरतर्फे गेल्या पाच वर्षांपासून अशरा-ए- उर्दू (दहा दिवसीय उर्दू संवर्धन कार्यक्रम) वेगवेग्ळ्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येते. याही वर्षी फोरमच्यावतीने शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत अशरा-ए-उर्दू साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी काही कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आले आहे. उर्दू भाषा, साहित्य व उर्दू माध्यम शिक्षणाच्या संवर्धनासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 
अशरा-ए-उर्दूचा उदघाटन शुक्रवारी (ता.5) सायं. 04.30 वाजता शाहिन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन, बीदर यांच्या संयुक्त विद्यमाने उर्दू और सायन्स या विषयावर ऑनलाईन भाषण होईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मो. अस्लम परवेज़, नई दिल्ली हे असणार आहे तर अशरा-ए-उर्दू 2021 चे उद्घाटन शाहीन ग्रुप, बीदरचे सचिव डॉ. अ. कदीर यांच्या हस्ते ऑनलाईन (झुम) पध्दतीने होणार आहे. 
इंडियन युथ असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता.6) सकाळी 11.00 वाजता उर्दू फ्रि न्यूज रिपोर्टींग स्पर्धा खादिमाने उर्दू फोरमच्या कार्यालयात (सिध्देश्वर पेठ, फाईव्ह स्टार हॉटेलच्या पाठीमागे) या ठिकाणी होईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार आफताब अन्वर शेख व अहमद शेख हे राहतील. 
हिंदी-उर्दु कौमी एकता मंच, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.7) सकाळी 11.00 वाजता उर्दूत्तर भाषिकांसाठी मोफत उर्दू वर्गाचे उद्घाटन फोरमच्या कार्यालयात समाजसेवक महेश गादेकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी डॉ. बंडोपंत पाटील राहतील. याच दिवशी चौथा कार्यक्रम दुपारी 2.00 वाजता अंजुमने तामीरे अख्लाक, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर ऍप्टीट्युड टेस्ट च्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. सायं. 7.00 वाजता एतेमाद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन ई-टिचिंग व्हीडिओ मेकिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात प्रमुख पाहुणे तौसिफ परवेज (अधिकारी उर्दू विभाग, एसडीआरटी, बालभारती पुणे) व सालिक बरकासी, मालेगांव हे उपस्थित राहतील. 
सोमवारी (ता.8) सकाळी 11.30 वाजता उर्दू विभाग पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी ते उर्दू व उर्दू ते मराठी भाषांतराचा एक दिवसी वर्कशॉप ऑनलाईन झुमवर आयोजित करण्यात आला आहे. या वर्कशॉपचे अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिणी फडणवीस राहतील. ज्येष्ठ भाषांतर तज्ञ नागपूरचे डॉ. मो. असदुल्लाह हे विद्यार्थ्यांना भाषांतराबाबत मार्गदर्शन करणार आहे. 
मंगळवारी (ता.9) सायं. 4.30 वा. मागील वर्षी ज्येष्ठ उर्दू साहित्यिक व इतर मान्यवरांचे निधन झाले त्यांना श्रध्दांजली वाहून त्यांची आठवणींना उजाळा देण्यासाठी यादे रफतगॉं हा ऑनलाईन कार्यक्रम होईल. 
बुधवारी (ता.10) रोजी सांय. 5.00 वाजता ऑनलाईन अल-हस्नात एज्युकेशन सोसायटी, नई मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उर्दूचे ज्येष्ठ कवी अल्लामा इक्‍बाल यांच्या कवितांना उजाळा देण्यासाठी इक्‍बाल की शायरी में खिदमते खलक का पैगाम या विषयावर इक्‍बाल तज्ञ व खतीबे कोकण अली एम. शमसी, नवी मुंबई यांचे व्याख्यान होणार आहे. 
शनिवारी (ता.13) सायंकाळी 07.00 वा. फोरमच्या कार्यालय येथे डिजीटल स्टेप्स कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी इ-टिचींग व्हिडीओ मेकिंग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. 
रविवारी (ता.14) सकाळी 11.00 वाजता (ऑनलाईन) नूर एज्युकेशन वेल्फेअर ऍण्ड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एनटीएसई रहेबरी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अकोल्याचे शकील इंजिनिअर हे आठवी व नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शन करणार आहे. दु. 4.00 वाजता फडकुले सभागृह येथे शिक्षकांसाठी प्रसिध्द गीतकार साहिर लुधयानवी यांच्या गजलावर आधारीत गजल/गीत गायकी का मुकाबला हा कार्यक्रम होईल. 
या सर्व स्पर्धाकांचे पारितोषिक व उर्दू अचिव्हर्स अवॉर्डचे वितरण रविवारी (ता.14) सायं. 7.00 वा. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. या दहा दिवसीय चालणाऱ्या कार्यक्रमास उर्दू भाषा प्रेमींनी उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन फोरमचे सचिव डॉ. शफी चोबदार यांनी केले आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT