वैराग (सोलापूर) : वैराग (ता. बार्शी) शहराच्या मुख्य चौकात रविवारी (ता. 7) रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विनापरवाना बसवल्या प्रकरणी ग्रामस्थ व प्रशासनामध्ये तणाव निर्माण झाला आहे. यामुळे सोमवारी सकाळपासून वातावरण गंभीर बनले आहे. संतप्त ग्रामस्थांनी पोलिस स्टेशनला घेराव घालण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना लाठीचार्ज करत पांगवले.
सध्या वैराग येथे शिवाजी चौकात पुतळा अनावरण व सुशोभीकरणासाठी समिती असून ग्रामपंचायतीच्या जागेत पुतळा बसवण्याचा ठराव 26 ऑक्टोबर 2010 च्या मासिक सभेत घेण्यात आला होता. मात्र दहा वर्षांनंतरही पुतळा अनावरणास परवानगी मिळाली नव्हती. सध्या येथे प्रशासक नियुक्त आहेत. शिवस्मारक समितीत पुतळा अनावरणाविषयी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच काल (रविवारी) रात्री दहा फुटी शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र सकाळी हा प्रकार लक्षात आल्याने बसवलेला पुतळ्याबाबत चौकशी करण्यासाठी पोलिसांनी माजी जिल्हा परिषद सभापती मकरंद निंबाळकर, माजी पंचायत समिती सदस्य निरंजन भूमकर, माजी सरपंच संतोष निंबाळकर, उपसरपंच संजय भूमकर यांना बोलावले होते. या वेळी बोलावण्यात आलेल्या संबंधितांनी हा पुतळा आम्ही बसवला नाही, असे सांगितले.
या वेळी ग्रामस्थांनी पोलिस चौकीसमोर गर्दी केली होती. महिला व ग्रामस्थांनी पुतळा अनावरण करण्यासाठी परवानगी मागितली. मात्र, पोलिसांनी, हा अधिकार आम्हाला नाही, असे सांगत ग्रामस्थांना परत जायला सांगितले. त्यापैकी एक जमाव परतला मात्र दुसरा जमाव थांबला होता. त्यांच्यावर सौम्य लाठीमार करत जमाव पांगवण्यात आला. याचे पर्यवसान गोंधळात होऊन जमावाने "पोलिस आमच्यावर अन्याय करत आहेत,' असे समजून पोलिस स्टेशनलाच घेराव घातला.
त्या वेळी तो परतावताना यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले असून, या प्रकाराने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले होते. परिस्थिती व कायदा- सुव्यवस्था लक्षात घेता शहर व चौकात बाहेरगावच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळी पोलिस निरीक्षक विनय बहिर, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर, वैरागचे प्रशासक एच. ए. गायकवाड, ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे, बार्शी तालुका शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, अरुण कापसे, भाजपचे राजेंद्र मिरगणे आदी प्रमुखांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी सांगितले, की सायंकाळी चार वाजता याबाबत पत्रकार परिषद आयोजित केले असून, या घटनेबाबतची माहिती दिली जाणार आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.