शहराच्या वेशीवर असलेल्या कोंडी, चिंचोली परिसरात बिबट्या आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.
सोलापूर : शहराच्या वेशीवर असलेल्या कोंडी, चिंचोली परिसरात बिबट्या (Leopard) आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनखात्याने शुक्रवारी (ता. 30) कोंडी, चिंचोली एमआयडीसी परिसरातील पाणथळ परिसरातील पाऊलखुणांची पाहणी केली. या पाऊलखुणा बिबट्याच्याच असल्याचे वन विभागाने (Forest Department) स्पष्ट केले आहे. सोलापूर शहराच्या वेशीवरच बिबट्याचा वावर असल्याचे कळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (The footprints at Kondi and Chincholi were found to be those of a leopard-ssd73)
कोंडी येथे वन खात्याकडून बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. एमआयडीसी परिसरातील असलेल्या कोल्ड स्टोअरेज येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्यासदृश प्राणी आढळून आला आहे. कोंडी येथील एमआयडीसी परिसरात झाडी आणि पाणथळ भाग असल्याने व या ठिकाणी रानडुकरांचा मोठा वावर असल्याने या भागात बिबट्याचा आश्रय असल्याचे या वेळी वनविभागाकडून सांगण्यात आले. कोंडी परिसरात आढळून आलेला बिबट्या हा शक्यतो मोहोळ भागातून प्रवास करत इथे पोचला असल्याचे सांगण्यात आले. वन खात्याच्या सहा जणांची टीम घटनास्थळाची पाहणी करीत आहे आणि बिबट्याचा शोध घेत आहे. पाणथळ आणि एमआयडीसी परिसरात असलेल्या कोल्ड स्टोअरेज येथे शुक्रवारी पुन्हा पाउलखुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पेट्रोलिंग वाढविली आहे. मागील चार दिवसांत बिबट्याने कोणत्याही माणसावर हल्ला केला नाही. त्यामुळे वन विभागाकडून येत्या काळात जागोजागी पिंजरा लावून त्याला जेरबंद केले जाईल, असे या वेळी सांगण्यात आले.
या केल्या उपाययोजना...
बिबट्याचा वावर असणाऱ्या भागात लावले जाणार पिंजरे
लोकांमध्ये जनजागृती करण्यास सुरवात
रात्रीची गस्त वाढविली
दिवसातून तीन वेळा परिसराची केली जाते पाहणी
कोंडी परिसरात बिबट्याची पावले असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र या परिसरात अद्याप बिबट्या कोणाच्याही निदर्शनास आलेला नाही. तरी परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. परिसरातील रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे.
- शंकर कुताटे, वनपाल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.