Pawar_Fadanvis
Pawar_Fadanvis Canva
सोलापूर

पोटनिवडणुकीवरून ठरणार राष्ट्रपती राजवटीची दिशा किंवा "महाविकास'ची लोकप्रियता

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीच्या माध्यमातून राज्याच्या महाविकास आघाडीची लोकप्रियता सिद्ध होणार आहे. हे सरकार अनैसर्गिक युती करून सत्तेवर आल्याचा विरोधकांच्या आरोपावरदेखील निवडणुकीतून शिक्‍कामोर्तब होणार आहे. कदाचित या मतदारसंघातील जनतेच्या नाराजीतून राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या मागणीला बळकटी येईल, अशीही चर्चा आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय शिंदे, आमदार संजय शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे भाजपनेही अनेक दिग्गजांना मैदानात उतरवले आहे.

राज्यातील वाढलेला कोरोना, काही प्रकरणांमध्ये मंत्र्यांवरच आरोप, कायदा- सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करीत विरोधक राष्ट्रपती राजवटीच्या अनुषंगाने तयारी करीत असल्याची चर्चा आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद विकोपाला गेला असून, दररोज एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, महाविकास आघाडीतील विविध मंत्रीदेखील या निवडणुकीत काय होणार, याकडे लक्ष देऊन आहेत.

परंतु, पोटनिवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नाराजी समोर येत असून, आमदार प्रणिती शिंदे यांचा अपवाद वगळता कॉंग्रेसचा अन्य कोणताही बडा नेता भगीरथ भालकेंच्या प्रचारात उतरलेला दिसत नाही. दुसरीकडे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला आव्हान दिले आहे. दुसरीकडे, काहीवेळा शिवसेनेकडून निवडणूक लढविलेले समाधान आवताडे आता भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद विभागल्याचे चित्र असून, त्याचा फायदा कोणाला होणार, याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ लावत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांच्या सातत्याने सभा होत असल्याने या प्रचार सभांमध्ये शिवसेनेचे नेते कुठे दिसत नाहीत. त्यांच्यातील नाराजी स्पष्ट दिसू लागली असून जिल्ह्याला संपर्कमंत्री, संपर्कप्रमुख, जिल्हा समन्वयक असतानाही कोणीही प्रचारासाठी फिरकले नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघातील शिवसेनेची निर्णायक ताकद कोणाच्या पाठीशी राहणार, याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ वर्तवू लागले आहेत.

भाजपचे दिग्गज प्रचाराच्या मैदानात

पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार संजय शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपविल्याची चर्चा आहे. तर भाजप महायुतीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आतापर्यंत महायुतीचे उमेदवार आवताडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सदाभाऊ खोत, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते, रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी प्रचारसभा घेत अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे.

या निवडणुकीत 35 गावांचा पाणीप्रश्‍नच महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे जलसंपदा खाते आहे, ते मंत्री स्वत: प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. अपक्षांच्या प्रचाराचाही रथ सुसाट सुटला आहे. या मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने भाजपने आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री राम शिंदे यांना प्रचारासाठी बोलावले आहे. आता कोण बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे.

बातमीदार : तात्या लांडगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT