Corona
Corona Media Gallery
सोलापूर

सोलापुरात कोरोनाचे मृत्यू तांडव! एकाच दिवशी 30 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना दाखल झाल्यापासून आजच्या अहवालात सर्वाधिक 30 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद आज पहिल्यांदाच घडली आहे. महापालिका हद्दीतील 14 तर ग्रामीण भागातील 16 अशा एकूण 30 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची मृत्यू संख्या कमी करण्यास जिल्हा प्रशासनाला अपयश येत आहे.

आजच्या अहवालात मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरस तालुक्‍यातील धर्मपुरी येथील एकूण 69 वर्षिय महिला, महाळुंग येथील 47 वर्षिय पुरुष, माळीनगर येथील 65 वर्षिय पुरुष व 72 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे. मंगळवेढ्यातील नागणे गल्ली येथील 60 वर्षिय व दामाजीनगर येथील 70 वर्षिय महिलेचा समावेश आहे. माढा तालुक्‍यातील भोसरे येथील 68 वर्षिय पुरुष व 50 वर्षिय पुरुष, कुर्डूवाडीतील 41 वर्षीय महिला व 50 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे. बार्शी तालुक्‍यातील उपळाई ठोंगे येथील 65 वर्षिय पुरुष, बार्शीच्या भवानी पेठेतील 80 वर्षीय महिला, बार्शीतील नाईकवाडी प्लॉट येथील 84 वर्षिय पुरुष व बार्शी तालुक्‍यातील कोरफळे येथील 60 वर्षिय महिलेचा समावेश आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील गुंजेगाव येथील 60 वर्षीय महिला व संगदरी येथील 68 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे.

जुळे सोलापुरातील गजानन नगर येथील 71 वर्षीय महिला, कल्याण नगर भाग नंबर एक परिसरातील 65 वर्षिय महिला, जुळे सोलापुरातील विश्वकर्ण पार्क परिसरातील 55 वर्षिय पुरुष, जुळे सोलापुरातील अक्षय सोसायटी परिसरातील 60 वर्षिय पुरुष, विजापूर नाका झोपडपट्टी नंबर एक परिसरातील 65 वर्षे पुरुष, पश्‍चिम मंगळवार पेठ परिसरातील 88 वर्षीय पुरुष, शेटे नगर लक्ष्मी पेठ परिसरातील 66 वर्षिय महिला, अशोक चौक परिसरातील लक्ष्मी नरसिंह स्वामी झोपडपट्टी परिसरातील 56 वर्षिय पुरुष, कर्णिक नगर परिसरातील 66 वर्षिय पुरुष, बुधवार पेठेतील साठे चाळ परिसरातील 75 वर्षीय महिला, मंगळवार पेठ परिसरातील तारा अपार्टमेंटमधील 56 वर्षिय पुरुष, शेळगी परिसरातील शिवगंगा नगर येथील 85 वर्षिय पुरुष, विजापूर रोड परिसरातील सुशीलनगर येथील 67 वर्षिय पुरुष, जगदंबा चौक परिसरातील पॅरागॉन अपार्टमेंट मधील 85 वर्षे पुरुष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

ठळक ...

  • ग्रामीणमध्ये 717 तर महापालिका हद्दीत 356 नवे रुग्ण

  • ग्रामीणमधील 453 तर महापालिका हद्दीतील 549 एकाच दिवशी कोरोनामुक्त

  • रुग्णालयात सध्या 9 हजार 87 ऍक्‍टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु

  • माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा, बार्शी कोरोनाचा हॉटस्पॉट

  • माळशिरस, बार्शी, माढ्यात प्रत्येकी चार मृत्यू

आजच्या अहवालानूसार बार्शी, माढा व माळशिरस या तालुक्‍यातील प्रत्येकी चार व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील प्रत्येकी दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील 1 हजार 345 तर महापालिका हद्दीतील 868 अशा एकूण 2 हजार 213 व्यक्तींचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT