सोलापूर ः त्या पक्ष्याने विटाच्या खोबणीत दोन पिल्ले दिले....पिले उडण्याआधीच त्यांच्या जगण्यावर संकट धडकले.....या संकटाची चाहूल लागलेल्या त्या त्या निसर्ग मित्राने अखेर पैसे मोजत त्या पिल्लांचे घरटे राखले. निसर्ग मित्र मुकुंद शेटे यांनी बंकलगी येथील निसर्ग मित्र मल्लिकार्जून धुळखेडे यांच्यासोबत घडलेला हा प्रसंग मांडला.
बंकलगी गावात शावण्णा अरवतवक्कल (गुरुजी) ह्यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी पंधराशे विटा दहा दिवसापूर्वी आणण्यात आल्या होत्या. पण मिस्त्री दहा दिवसानंतर आला. मिस्त्री संजय कुंभार इतर बांधकाम कामे संपवुन बांधकाम करण्यासाठी बंकलगी येथे आले. बांधकाम सुरू करण्यासाठी माल कालवला व विटा घेण्यासाठी गेले असता. विटांच्या जागा मध्ये त्यांना एका पक्ष्याचे घरटे दिसुन आले. घरट्यात दोन छोट्या पिल्लांना आई खाद्य भरवत होती.
दहा दिवसात विटांच्या रिकाम्या ढिगारात पक्ष्याने घरटे बांधले होते. मिस्त्री संजय कुंभार ह्यांना काय करावे समजत नव्हते. त्यांनी बंकलगी मधील प्राणी मित्र मल्लिकार्जुन धुळखेङे ह्यांना घटनास्थळी बोलावले. घरट्याची पाहणी केली तेव्हा हे घरटे भारतीय दयाळ पक्षी ( इंडियन रॉबिन) याचे होते.
घरटे पाहणी केल्यास समजले की विटा काढल्यास घरटे पुर्ण पणे उघडे पडेल व पिल्ले जगणे शक्य होणार नाही. पिल्ले पुर्ण वाढ होईपर्यंत घरट्यात राहणे आवश्यक होते. कारण घरट्याशिवाय त्यांना दुसरी नैसर्गिक सुरक्षितता मिळण अशक्य होते. मिस्त्री व घरमालक शावण्णा अरवतवक्कल( गुरुजी) ह्यांना विटा न हालविण्याची विनंती करण्यात आली. परंतु मिस्त्री संजय कुंभार यांनी सांगितले की, हे बांधकाम सुरू करणे आवश्यक आहे. माझी मजुरी पुर्णपणे बुडेल.
ही सर्व बाब समजताच तात्काळ धुळखेङे ह्यांनी नव्या पंधराशे विटांची ऑडर्र दिली. विटा पोहच होई पर्यंत बुडलेली मजुरी देतो असे सांगितले. परंतु मिस्त्री कुंभार ह्यांनी माणुसकी दाखवत मजुरी घेण्यास नकार दिला. घरमालक शावण्णा अरवतवक्कल (गुरुजी) यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दोन दिवस बांधकाम नवीन विटा पोहचहोई पर्यंत थांबविण्यात आले आहे. या प्रकाराने मात्र दयाळ पक्ष्यांच्या पिलांना जिवदान मिळू शकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.