Fasting
Fasting sakal
सोलापूर

Mangalwedha News : चिक्कलगीत मंजूर रस्त्यावरून दोन गटाचे उपोषणाशास्त्र

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - तालुक्यातील चिक्कलगी येथे 25:15 योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामासाठीची कागदपत्राची पुर्तता न केल्यावरून व मुळ नकाशा प्रमाणे करण्यात यावे. या मागणीवरून दोन गटात परस्परविरोधी उपोषण ग्रामपंचायतची समोर सुरू असल्याने खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, शिरनांदगी रोडवरील कोळी वस्ती परिसरात रस्ता व्हावा ही मागणी करून 25 :15 योजनेतून या ठिकाणी रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले. व त्या मंजूर कामासाठी आवश्यक असणारी कागदपत्राचा पूर्तता ग्रामपंचायतने करावी म्हणून जि.प.बांधकामला सादर करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला.

मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अडवणुकीमुळे ग्रामपंचायतीने कागदपत्रे सादर करण्याकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणात टाळाटाळ केल्यावरून संतप्त झालेल्या तेजस कोळी व विश्वनाथ कोळीसह नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर गेले तीन दिवसापासून उपोषण करत ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणावर व विरोधी वागणूक देत असल्याच्या कारणावरून उपोषणाचे अस्त्र उगारले.

दरम्यान याच उपोषणाच्या समोर प्रति उपोषण करत मंजूर रस्ता गाव नकाशा प्रमाणे काम करावे या मागणीसाठी मधुकर टपरे व राजेंद्र कोळी यांनी देखील उपोषण सुरू केले. रस्त्याच्या कामावरून या दोन गटात सुरू असलेल्या प्रती उपोषणात प्रशासनाने नेमकी कोणती भूमिका घ्यावी असा प्रश्न प्रशासनासमोर समोर उभा राहिला.

तीन दिवस सुट्टीच्या दिवसात सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासनाने देखील गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची ओरड होताच गटविकास अधिकाऱ्यांनी आज सायंकाळच्या दरम्यान उपोषण स्थळे भेट दिली. व इतर काही दिवसात दोन गटात योग्य समन्वय करून तोडगा काढू असे आश्वासन दिल्यामुळे एका गटाने उपोषण स्थगित केले. तर दुसऱ्या गटाने गाव नकाशा प्रमाणे रस्ता करू अशी लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT