Two truck robbers arrested in three days, seize goods worth Rs six lakh
Two truck robbers arrested in three days, seize goods worth Rs six lakh 
सोलापूर

मिरचीचा ट्रक लुटणारे दोघे तीन दिवसांत जेरबंद; सहा लाखांचा माल हस्तगत 

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : सोलापूर-पुणे महामार्गावर वरवडे टोलनाक्‍याजवळ लाल मिरचीची पोती घेऊन निघालेला मालट्रक चालकासह पळवून नेऊन लुटला. यातील तीन संशयित आरोपींपैंकी दोन संशयितांना टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे सहा लाख रुपये किमतीची लाल मिरचीची 118 पोती हस्तगत केली. दोन्ही संशयितांना माढा न्यायालयसमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. आर. सय्यद यांनी 30 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
याप्रकरणी गोविंद सिद्धेश्‍वर घुगे (वय 20), जुबेर मकबूल खान (वय 27, रा. दोघेही लऊळ, ता. माढा, जि. सोलापूर) यांना अटक केली आहे. देहूरोड (पुणे) येथील रिहान रोड कॅरिअर्स ही ट्रान्स्पोर्ट कंपनी असून इम्तियाज इसाक शेख यांच्या सुमारे 60 मालट्रक या कंपनीत आहेत. प्रत्येक गाडीची माहिती मिळण्यासाठी सर्व मालट्रकला जीपीआरएस सिस्टीम बसविली आहे. ट्रकचालक बळीराम नथुनी राजभर (वय 52, रा. देहूरोड पुणे) हा मालट्रक (एमएच 12/ एन एक्‍स 4294) मध्ये विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथून लाल मिरचीची 307 पोती घेऊन पुण्याकडे निघाला होता. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर वरवडे टोलनाक्‍याच्या ट्रक बाजूस उभा केला. तेव्हा तीन तरुण ट्रकच्या केबीनमध्ये चढले. त्यापैकी दोघांनी ट्रकचालकास सीटवरून बाजूला केबीनमध्ये ओढले व त्या दोघांनी ट्रकचालकास मारहाण करण्यास सुरवात केली. ट्रकचालकाचे दोन्ही हात बांधून त्यास केबीनमध्ये झोपविले. या चोरट्यांनी ट्रकचालकाकडील 20 हजार रुपये व 10 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. महामागं सोडून हा ट्रक अन्य मार्गाने ते घेऊन गेले. त्यांनी एका ठिकाणी ट्रक थांबवून त्यातील पाच लाख 94 हजार 720 रुपये किमतीची लाल मिरचीची 118 पोती उतरवली. नंतर हा ट्रक आडमार्गाने घेऊन जाऊ लागले. 
दरम्यान, मालट्रकमधील जीपीआरएस कार्यरत असल्याने मालट्रक पुण्याकडे येण्याऐवजी अन्य मार्गाने जात असल्याचे इम्तियाज शेख यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या दुसरा ट्रकचालक मारुती पुंडलिक वर्मा हा मालट्रक (एन एल 01/ ए सी 1434) घेऊन पुण्याकडे निघाला होता. मोहोळजवळ असताना मालक इम्तियाज शेख यांनी मिरचीची ट्रक कोणतरी पळवून नेत असून त्या मालट्रकचे लोकेशन सांगून पाठलाग करण्यास सांगितले. या ट्रकचा पाठलाग करीत त्याने शेंद्रीपाटी जवळ मालट्रकला गाठले. त्यावेळी मालट्रक दुसराच चालवित असल्याचे दिसल्याने त्याने चालकास ओरडून ट्रक थांबविण्यास सांगितले. त्यावेळी यातील दोन तरुणांना शंका आल्याने शेंद्रीपाटी जवळ ट्रक उभा करून दुचाकीवर बसून निघून गेले. ट्रकचालक बळीराम राजभर याने बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे लऊळ येथील गोविंद सिद्धेश्‍वर घुगे व जुबेर मकबूल खान या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखवताच बावी येथील प्रशांत ज्ञानदेव मोरे यांच्या माळरानावरील कोरड्या शेततळ्यात उतरविलेली 118 लाल मिरचीची पोती दाखविली ती पोलिसांनी ताब्यात घेतली. यानंतर दोन्ही संशयितांना माढा न्यायालयसमोर हजर करण्यात आले असता 30 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT