0Child_marriage.jpg
0Child_marriage.jpg 
सोलापूर

19 वर्षाचा मुलगा अन्‌ 15 वर्षाच्या मुलीचा गुरुवारी विवाह ! पण, वधू हळदीदिवशीच...

तात्या लांडगे

सोलापूर : विवाहावेळी मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्‍यक आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन करुन मुलगा 19 वर्षाचा आणि मुलगी 15 वर्षाची असतानाच पालकांनी विवाह ठरविला. गुरुवारी (ता. 31) विवाहाचा मुहूर्त काढला, मात्र त्याची माहिती जिल्हा बालकल्याण समितीपर्यंत पोहचली. त्यानंतर समितीच्या सदस्यांनी त्या मुलीला हळदीदिवशीच (गुरुवारी) ताब्यात घेतल्याने तो बालविवाह रोखण्यात बालकल्याण समितीला यश आले आहे. मुलगी माळशिरस तालुक्‍यातील तर मुलगा पंढरपूर तालुक्‍यातील आहे.

आदल्यादिवशीच (बुधवारी) वधूला घेतले ताब्यात
माळशिरस तालुक्‍यातील अकलूजमधील 15 वर्षीय मुलीची नववी पूर्ण झाली आहे. तिचे आई- वडिल शेतकरी असून परिस्थिती जेमतेम आहे. लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने शिक्षणही बंदच आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्‍यातील त्यांच्या नात्यातील मुलासोबत त्यांनी आपल्या मुलीचा विवाह ठरविला. विशेष म्हणजे मुलाचे वय 19 असून तो पदवीचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या विवाहाचा मुहूर्त 31 डिसेंबर असल्याचे जिल्हा बालकल्याण समितीला समजले. त्यानंतर समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी, सुवर्णा बुंदाले, प्रकाश ढेपे, विलास शिंदे यांनी त्याठिकाणी धाव घेतली. मुला- मुलीच्या आई- वडिलांची समजूत काढून त्यांनी मुलीला ताब्यात घेतल्याने उद्याचा (गुरुवारी) बालविवाह रोखण्यात आला आहे.

'रिकामे डोके अन्‌ नको ते उद्योग' या उक्‍तीचा काही पालकांना लॉकडाउनमध्ये अनुभव आल्याने त्यांनी बालवयातच आपल्या मुलीला वर शोधून विवाह लावून देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दुसरीकडे काही मुलींना आई अथवा वडिल नाही किंवा काहींना दोघेही नाहीत. त्यांचा सांभाळ मामा, काका, आजी करीत आहे. अशा तब्बल 60 मुलींचा बालविवाह रोखण्यात जिल्हा बालकल्याण समितीला मार्च ते 30 डिसेंबर या काळात यश मिळाले आहे. दरम्यान, पालकांनी मुलीला पूर्णपणे शिक्षण द्यावे, तिची शारिरीक व मानसिक वाढ होऊ द्यावी. बालवयात विवाह केल्याने तिच्या संसारात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्‍वभूमीवर तेथील लोकप्रतिनिधी, गावचे सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविकांनी पालकांना जागृत करायला हवे, अशी अपेक्षा जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी यांनी व्यक्‍त केली. बालविवाह रोखल्यानंतर संबंधित मुलीची काळजी व संरक्षणाची जबाबदारी बालकल्याण समितीतर्फे पार पाडली जाते. पालकांकडून मुलीला कोणताही त्रास करणार नाही, 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह लावून देणार नाही, असे बॉण्ड पेपरवर लिहून घेतले जात आहे. तर काही प्रसंगात मुलीला आठ ते 30 दिवसांपर्यंत बालकल्याण समितीकडे ठेवून घेतले जाते, असेही कुलकर्णी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा म्हणाल्या...

  • लॉकडाउन काळात जिल्ह्यातील 60 बालविवाह रोखण्यात जिल्हा बालकल्याण समितीला यश
  • करमाळा, बार्शी तालुका अव्वल; आई- वडिल असतानाही बालवयात मुलीचा लावला जातोय विवाह
  • आई-वडिलांविना काका, मामा, आजीकडे राहायला असलेल्या मुलींचे बालवयात होणारे विवाह रोखले
  • शाळा बंद असल्याने घरी असताना मॅच्युअर झालेल्या मुलींचा विवाह लहानपणीच लावण्याचे वाढतेय प्रमाण
  • 19 वर्षीय मुलाचा विवाहही रोखले; एका तालुक्‍यातील 13 वर्षीय मुलीसोबत 29 वर्षीय मुलाचा होणारा विवाह रोखला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT