
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (६ जून) इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात ३३६ धावांनी पराभवाचा धक्का दिला. भारताचा हा बर्मिंगहॅममधील कसोटीतील पहिला विजय ठरला. भारताने पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले.
यासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. आता या कसोटी मालिकेतील तिसरा सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर १० जुलैपासून खेळवला जाणार आहे.