soya
soya esakal
पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी खुशखबर: सोयाबीन दर वाढले; असा आहे भाव

शामराव गावडे

नवेखेड (सांगली) : मागील सात आठ महिन्यापासून सोयाबीनच्या दराने तेजी गाठली आहे. आजच्या घडीला सोयाबीन भाव प्रतिक्विंटल तबल सात हजार रुपयांवर गेला आहे. सोयाबिन दराच्या इतिहासात पहिल्यांदाच दराने तेजी गाठली आहे.

पामतेलाची आवक बंद झाल्याने सोयाबीन दरात तेजी असल्याचे जाणकारांचे मत आहे.सोयाबीन तेलाचा रोजच्या जेवणात सध्या भरपूर वापर सुरू आहे. तेलाच्या दरात वाढ झाल्याने सोयाबीन खरेदी किमतीत मोठी वाढ झाली आहे.त्याचबरोबर गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनचे उत्पन्न घटले. त्याचा ही परिणाम दरवाढीवर झाला आहे.

सोयाबीनची खरेदीची आधारभूत किंमत ३८८० प्रतिक्विंटल आहे. साधारणपणे शेतकरी ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सोयाबीन काढून लगेच विकतो. या दर वाढीचा फायदा अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांना होणार आहे. आता प्रामुख्याने व्यापरांच्याकडे असणाऱ्याच सोयाबीनची खरेदी विक्री सुरू आहे.

दरम्यान वायदे बाजारात सोयाबीनचे दर ७२०० प्रतिक्विंटल दाखवत असल्याने दराची तेजी कायम राहील अशी चिन्हे आहेत.येत्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीनच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळेल अशी चिन्हे आहेत.

शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामात नगदी पीक म्हणून सोयाबीन लागवड करावी. सोयाबीन काढून ऊस लावण होऊ शकते. तीन महिन्यात चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक शेतकऱ्यांना येत्या हंगामात संजीवनी देणारे ठरेल.

विजय जाधव,सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, इसलामपूर.

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT