पश्चिम महाराष्ट्र

‘वंचित’सोबतची काँग्रेसची वाट बिकटच

निवास चौगले

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ऐवजी वंचित बहुजन आघाडीबरोबर जाण्याची काँग्रेसची वाट जिल्ह्यात तरी बिकट आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या तुलनेत ‘राष्ट्रवादी’ची स्थिती बरी आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांत असलेले मतभेद आणि त्यातून कार्यकर्त्यांत निर्माण झालेली अस्वस्थता मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विचार करता काँग्रेसला ‘राष्ट्रवादी’बरोबरची आघाडीच फायद्याची ठरणार आहे.

मुंबईत काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत विधानसभेला राष्ट्रवादीऐवजी ‘वंचित’सोबत आघाडी करण्यावर चर्चा झाली. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याचा विचार करता ‘वंचित’सोबतची काँग्रेसची वाट सध्यातरी अवघड वाटत आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या दहापैकी सहा जागा सेनेकडे, तर प्रत्येकी दोन जागा राष्ट्रवादी व भाजपकडे आहेत. जिल्हा बॅंकेवर राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. महापालिकेत दोन्ही काँग्रेसची आघाडी आहे. बहुंताशी नगरपालिकांत भाजप-सेनेची किंवा स्थानिक आघाड्यांची सत्ता आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्हीही जागा सेनेने जिंकल्या आहेत. याचा विचार केला तर आजच्या घडीला जिल्ह्यात भाजपा-सेना युतीची ताकद वाढल्याचे दिसते.

लोकसभेच्या निवडणुकीत ‘वंचित’च्या उमेदवारांमुळे दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे दहा उमेदवार पराभूत झाले आहेत. हातकणंगलेत ‘वंचित’च्या उमेदवाराला एक लाख ३० हजार मते मिळाली, तर आघाडीचे पराभूत उमेदवार खासदार राजू शेट्टी ९६ हजार मतांनी पराभूत झाले. राज्यात ५५ विधानसभा मतदारसंघांत ‘वंचित’ला मताधिक्‍य मिळाले आहे. ‘वंचित’ची वाढलेली ताकद पाहून काँग्रेस नेते त्यांना सोबत घेण्याचा विचार करत असले, तरीही जिल्ह्यात त्याचा फारसा फायदा होण्याची शक्‍यता नाही. कारण, घराणेशाहीला विरोध यातूनच ‘वंचित’ची स्थापना झाली आहे.

‘वंचित’ अशी अस्मिताच त्यांनी स्वीकारली आहे. दुसरीकडे दोन्ही काँग्रेसचे राजकारणच घराणेशाहीवर अवलंबून आहे. अशा स्थितीत ‘काँग्रेस-वंचित’ अशी आघाडी झालीच, तर ‘वंचित’ची मते विरोधात जाण्याची शक्‍यता आहे. याउलट ‘वंचित’ स्वतंत्रपणे रिंगणात उतरल्यास त्याचा फायदा कदाचित दोन्ही काँग्रेसला होऊ शकतो. 

कोल्हापूर हा दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. २०१४ च्या विधानसभेचा अपवाद वगळता या जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसने चांगले यश मिळवले आहे; पण आता काँग्रेसमध्येच अस्वस्थता आहे, लोकसभेला उमेदवार पराभूत झाल्याने राष्ट्रवादीत फारसा उत्साह नाही. अशा स्थितीत दोन्ही काँग्रेसने एकत्र लढणेच जिल्ह्याच्या राजकाणाच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे.
विधानसभानिहाय 

‘वंचित’ला पडलेली मते
कोल्हापूर लोकसभा
कोल्हापूर उत्तर-७१८३, राधानगरी-१०,४४४, करवीर -१६,५२२, कोल्हापूर दक्षिण-११,३७३, कागल - ९,८३३, चंदगड-७,८९६

हातकणंगले लोकसभा
शिराळा-१०,२२२, इस्लामपूर-१०,८०३, शिरोळ-२७,९१३, हातकणंगले-४२,३२५, इचलकरंजी-१७,३०१, शाहूवाडी-१४,५५५.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT