statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News: छत्रपती शिवाजी महाराजांचा रातोरात पुतळा हटवला; आंदोलकांची पोलिसांशी झटापट, 30 जणांना अटक

सध्या परिसरात प्रशासनाकडून 144 कलम लागू करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या परिसरात प्रशासनाकडून 144 कलम लागू करण्यात आलं आहे.

सांगली : काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यानंतर वाद उफाळला असतानाच, आता सांगली जिल्ह्यात शिवरायांबाबत एक प्रकरण समोर आलंय.

सांगलीतील आष्टा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा वाद आता पुन्हा पेटला आहे. आष्टा शहरात मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गनिमी काव्यानं प्रतिष्ठापना केली. दरम्यान, प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हठवण्यात येणार असल्याचं समजल्यानं या ठिकाणी रस्तारोको आंदोलन सुरू करण्यात आलं.

भाजपचे निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. मात्र, असं असतानाच आज (बुधवार) रात्री पोलीस (Police) बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. हा पुतळा हटवल्यामुळं वाद पेटण्याची शक्यता आहे. शिवभक्तांकडून रातोरात बसवण्यात आलेला शिवरायांचा पुतळा प्रशासनाकडून हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय.

दरम्यान, पुतळा हटवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयानंतर रास्ता रोको प्रकरणी तीस आंदोलकांना अटक करण्यात आलीये. पोलीस प्रशासनाविरोधात समस्त शिवप्रेमींनी आज आष्टासह वाळवा तालुका बंदची हाक दिलीये. सध्या परिसरात प्रशासनाकडून 144 कलम लागू करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT