stepmother died case sangli Incident at Haroli sangli crime marathi news
stepmother died case sangli Incident at Haroli sangli crime marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

सोफासेटवरती झोपलेल्या आईवर मुलानेच केले कुऱ्हाडीने सपासप वार अन्

सकाळ वृत्तसेवा

कवठेमहांकाळ (सांगली) :  तालुक्‍यातील हरोली येथील सुर्वे मळ्यात मुलाकडूनच सावत्र आईचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. नंदा संभाजी सुर्वे (वय ५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा अमोल संभाजी सुर्वे (वय २९) याच्यावर कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मृत नंदा यांचे पती संभाजी यांनी फिर्याद दिली. घटनेने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  

तालुक्‍यातील हरोली गावापासून दोन किलोमीटर अंतरावर सुर्वे वस्ती आहे. नंदा सुर्वे काही दिवसांपासून बॅंकेत आपल्या नावावर दोन लाख रुपये टाकावेत, अशी मागणी कुटुंबीयांना करीत होत्या. यातून अनेक वेळा घरात वाद झाले होते. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नंदा सुर्वे सोफासेटवरती झोपल्या असताना अमोलने शिवीगाळ करीत कुऱ्हाडीने सपासप वार करून जखमी केले. 

नंदा यास जखमी अवस्थेत कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी सांगलीतील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषणा डॉक्‍टरांनी केली. त्यानंतर संशयित मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी हजर झाले. घटनास्थळी जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट दिली.

 हेही वाचा-कोल्हापूरचे ॲड. युवराज नरवणकर भारतातील सर्वोत्तम आणि प्रभावशाली फोर्ब्सच्या यादीत
निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिवाजी करे, उपनिरीक्षक अक्षय ठिकणे, अंमलदार राजू मानवर, मनोज पाटील, दादासाहेब ठोंबरे, आमीरशा फकीर, सुहास मोहिते, गजानन बिरादार, तानाजी लाड यांनी संशयित अमोल सुर्वे याला त्याब्यात घेऊन अटक केली. घटनेची पोलिसात नोंद झाली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे 
करीत आहेत.

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT