पश्चिम महाराष्ट्र

...इथं दप्तराविना भरते शाळा! (व्हिडिओ)

विश्वभूषण लिमये

उंदरगाव (सोलापूर) : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने परिपत्रक काढले. मात्र, ते केवळ कागदावरच राहिले. अद्यापही विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी झालेले दिसत नाही, असे असताना माढा तालुक्यातील उंदरगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दप्तराविना भरत आहे.

दप्तर न घेता विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे हे अचंबित करणार असू शकतं. मात्र, हे खरे आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे पाहून या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम मागील तीन महिन्यांपासून सुरु केला. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी या शाळेत दप्तराविना विद्यार्थी येतात. या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या बाहेरचे ज्ञान दिले जाते. त्यामुळे चिमुकल्यांना देखील या दिवशी पुस्तकांच्या बाहेरची दुनिया अनुभवता येते.

याबाबत उंदरगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर कापसे यांनी सांगितले, की 'मुलांना चांगले शिक्षण मिळावे. त्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या शाळेत दर शनिवारी हा उपक्रम घेतला जातो. पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान आम्ही त्यांना देत आहोत. उपयुक्त शिक्षण घेता यावे. हसत खेळत शिक्षण घेता यावे, हा यामागचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थी आनंदाने शाळेत येतात'.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT