पश्चिम महाराष्ट्र

वीज दरवाढ विरोधात कॉंग्रेसतर्फे साखर वाटप 

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी - अन्यायी वीज दरवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी करीत इचलकरंजी शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे सोमवारी मलाबादे चौकात निदर्शने करण्यात आली. शंखध्वनी करीत वीज दरवाढीची दसरा-दिवाळीची भेट दिल्याबद्दल साखर वाटप करून उपरोधीक आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. विविध घोषणा देत भाजप सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. मोरे, नगरसेवक शशांक बावचकर, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, तुकाराम पाटील यांनी वीज दरवाढीतबाबत शासनाच्या धोरणांवर कडाडून टिका केली. अन्यायी वीज दरवाढ तातडीने रद्द न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. 

आंदोलनात सुनील पाटील, अहमद मुजावर, पै. अमृत भोसले, राजू बोंद्रे, सुधाकर कुलकर्णी, प्रितम गुगळे, शंकर चौधरी, बाबूलाल चौधरी, श्रवणराम चौधरी, सुनील चौधरी, पवन शिंदे, प्रवीण केर्ले, यशवंत वाणी, ब्रह्मा आरुगडे, अनिल माने, विष्णू शिंदे, वैभव पोवार, बिलाल नदाफ, राहुल बुरसे आदी सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT