Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik 
पश्चिम महाराष्ट्र

तीस गावातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न निकाली

राजकुमार शहा

मोहोळ : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नव्याने ३० गावांचा समावेश करण्याला आला होता, नव्याने समावेश केलेल्या गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भागभांडवल धारक (शेअर होल्डर) सभासद करून घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ज्या शेतकऱ्यांना सभासद व्हायचे असेल त्यांनी कारखान्याच्या सभासद नोंदणी विभागाशी संपर्क साधावा अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी दिली, त्यामुळे तीस गावातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न निकाली निघाला आहे. 

या संदर्भात अधिक माहिती देताना खा महाडिक म्हणाले  कारखान्यात पूर्वी प्रतिदीन २५०० मे.टन. ऊसाचे  गाळप होत होते , विस्तारीकरणामुळे  आता ते   प्रतिदीन ५००० मे.टन  गाळप होणार आहे . त्यामुळे चालू २०१८-२०१९ च्या हंगामात कारखाना पुर्ण  क्षमतेने गाळप करणार आहे. त्या अनुषंगाने जादा ऊसाची गरज भासणार  आहे. म्हणून नव्याने मोहोळ व पंढरपुर तालुक्यातील ३० गावाचा समावेश कार्यक्षेत्रात केला आहे. त्यात  मोहोळ तालुक्यातील मिरी, सारोळे, सय्यदवरवडे, परमेश्वरपिंपरी, रामहिंगणी, दादपूर, शिरापू, पिरटाकळी, कोळेगाव, कामती (खु.), कामती बु., विरवडे खु., विरवडे बु.,कोरवली, जामगांव हराळवाडी, पोफळी( पांडवाची), सावळेश्वर, लाबोंटी, अर्धनारी आदी गावे तर पंढरपुर तालुक्यातील पोहरगाव,खरसोळी,सरकोली, अजनसोंड, ईश्वरवठार,बिटरगाव, मगरवाडी, देगाव,पुळूज वाडी आदी गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी  सभासद होण्यासाठी कारखान्याच्या सभासद नोंदणी विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन खा  महाडिक यांनी यावेळी केले. यामुळे भिमाच्या निवडणुकीत दिलेल्या सर्वात महत्वाच्या आश्वासनाची पुर्तता झाल्याचे खा महाडिक यांनी सांगीतले. यावेळी श्रीधर बिरजे,  कार्यकारी संचालक अशोक पाटील , उपाध्यक्ष सतीश जगताप उपस्थीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

Nashik Crime News : रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पानेवाडीत इंधनाची चोरी; 6 जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

SCROLL FOR NEXT