sushilkumar
sushilkumar 
पश्चिम महाराष्ट्र

आश्वासने खोटी ठरल्याने भाजपला बसतील सतत चटके

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : सत्तेवर येण्यासाठी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरल्याने भाजपला त्याचे चटके सोसावे लागतील, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला. चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशातील भाजपविरोधी आघाडीच्या प्रक्रियेला वेग येईल, असेही ते म्हणाले.

शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी " सकाळ" शी  संवाद साधला. ते म्हणाले, देशाचे वातावरण बदल आहे. ज्या पद्धतीने भाजपने देशाला आश्वासित केले, 
ती सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहीला नाही. त्यामुळे त्याचे चटके भाजपला सातत्याने सोसावे लागतील.

भारतीय जनता पार्टी व त्यांची सहयोगी पार्टी फक्त पब्लिसीटीच्या मागे आहेत. ज्या पद्धतीने पंतप्रधान बोलतात, बोलो जोर से बोलो...पण हातात काही नाही. आता यापेक्षा आणखी काय पुरावा हवा, की देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी नोटाबंदीमुळे देशाचे नुकसान झाल्याचे वक्तव्य केले. हा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर आहे. सोलापूरच्या मतदारांना खोटी आश्वासने दिली. चार वर्षांत पाच मीटर कापडही खरेदी केले नाही. सोलापूरकरांची दिशाभूल केली, असेही शिंदे म्हणाले.

उमेदवार निश्चित प्रक्रियेमध्ये माझातरी सहभाग असला तरी, मला तशी घोषणा करता येणार नाही. पार्टीने सांगितले उभे रहा, रिझर्व्ह
जागेवर उभे राहण्यास सांगितले, उभा राहिलो. विधानसभेत यंदा आमच्या जागा निश्चित वाढणार आहेत, असा दावाही शिंदे यांनी केला.

... म्हणून झाला काँग्रेसचा पराभव
आमची सत्ता असताना एखाद्या मंत्र्यांवर किंवा पदाधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे, भ्रष्टाचाराचे आरोप झाले की आम्ही त्यांचे राजीनामे घेत होतो.
केंद्रात व राज्यातही हीच भूमिका होती. त्यामुळे आमच्या पक्षात मोठे भ्रष्टाचारी आहेत, असे चित्र निर्माण झाले. त्याचा मोठा फटका आम्हाला बसला व कॅांग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. आता कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले, मात्र कोणावरही कारवाई नाही की कुणाकडून राजीनामे घेतले नाहीत. राफेलचा घोटाळा हे त्याचे उत्तम उदाहरण
आहे, असे शिंदे म्हणाले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT