education
education 
पश्चिम महाराष्ट्र

गुरुजींची होणार संघटनेतून हकालपट्टी 

संतोष सिरसट

सोलापूर : जे शिक्षक ब्लेझर परिधान करून शाळेत जातील, त्यांची संघटनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिक्षक संघटना समन्वय समितीच्या बैठकीत घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार याकडे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 

दिवाळी सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस वेगवेगळ्या कारणांनी चर्चिला गेला. जिल्हा परिषद प्रशासनाने केलेली ब्लेझरची सक्ती, त्याला शिक्षक संघटनांनी केलेला विरोध या सगळ्याच गोष्टी चर्चेत होत्या. ब्लेझरचा विषय जरी शिक्षक संघटनांच्या नेत्यांकडून आला असला तरी त्याला जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रचंड विरोध केला. शिक्षकांचा ब्लेझरविषयी असलेला रोष पाहून शिक्षक नेत्यांना एक पाऊल मागे घेत ब्लेझरला विरोध करण्याचा निर्णय घ्यावा लागला. शिक्षकांनी केलेल्या विरोधामुळेच शिक्षक नेत्यांनी हा निर्णय बदलला. त्याबाबत शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक झाली. त्या बैठकीत ब्लेझरच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. ब्लेझरला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकजूट करण्याचा निर्णयही घेतला. मात्र, काही शिक्षकांनी समन्वय समितीने घेतलेला निर्णय पाळला नाही.

प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार अनेक शिक्षकांनी ब्लेझर घातले. काही शिक्षकांनी संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ब्लेझर असूनही ते परिधान केले नाहीत. शाळेत जाताना पिशवीमध्ये घालून अनेक गुरुजींनी ब्लेझर नेले. मात्र, संघटनेच्या आवाहनानुसार ते परिधान करणे टाळले. ज्या शिक्षकांनी ब्लेझर घातले त्यांच्याबाबत शिक्षकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होऊ लागली. ज्या संघटनेच्या गुरुजींनी ब्लेझर घातले, त्या संघटनेच्या नेत्यांना याबाबत विचारणा होऊ लागली आहे. त्यावेळी या सगळ्यांवर तोडगा म्हणून संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद न देता ब्लेझर घालणाऱ्या गुरुजींची संघटनेतून हकालपट्टी करण्याच्या हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. 

प्रशासनाचा अहवाल अद्यापही अपूर्णच 
शाळेच्या पहिल्या दिवशी किती शिक्षक ब्लेझरमध्ये आले होते, याची माहिती दुसऱ्या दिवशीही शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाली नाही. अनेकवेळा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे ही माहिती मागितली असता त्यांच्याकडून ती देण्यास दिरंगाई होत असल्याचे चित्र शिक्षण विभागात पाहायला मिळाले. दावे-प्रतिदावे झाल्यानंतर प्रत्यक्षात किती शिक्षकांनी ब्लेझर घातला व किती शिक्षकांनी घातला नाही हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT