nagthane
nagthane 
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षकांच्या तत्परतेमुळे वाचला ग्रामस्थाचा जीव

सुनील शेडगे

नागठाणे -  मोरबाग (ता. सातारा) या दुर्गम भागातील गावात शिक्षकांच्या तत्परतेमुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या जीवावरचे संकट टळले. सातारा येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात पोहोचविण्याकामी शिक्षकांनी दाखविलेली जागरूकता कौतुकाचा विषय बनली.

मोरबाग हे सातारा तालुक्याच्या पश्चिम भागातील गाव. सातारा ते ठोसेघर या मुख्य मार्गापासून सुमारे दहा किलोमीटर आतील बाजूस हे गाव आहे. भोवताली गर्द जंगल आहे. श्वापदांचा वावरही मोठ्या प्रमाणात असतो. अशा स्थितीत गुरे चारावयास गेलेल्या कोंडिबा जानकर या ग्रामस्थास सर्पदंश झाला. गावातील ग्रामस्थांसह शाळेतील शिक्षकांना ही बातमी समजली. या सर्वांनी धावाधाव करुन तातडीचे प्रथमोपचार केले. जानकर यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात पोहोचविणे गरजेचे होते. मात्र वाहनांची सुविधा नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. अशा वेळी विजय कदम या शिक्षकाने आपल्या दुचाकीवर जानकर यांना घेतले. सोबतीला राघोजी अवकिरकर या ग्रामस्थास घेतले. रस्त्याची अवस्था फारशी चांगली नसताना श्री. कदम यांनी कसरत करत गाडी मुख्य रस्त्यापर्यंत आणली. दरम्यानच्या काळात विश्वास कवडे, राहुल सावंत, गणेश शिंदे या शिक्षकांनी अॅम्ब्युलन्सशी संपर्क साधला. त्यामुळे जानकर यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात पोहोचविणे सुलभ झाले. वेळीच उपचार मिळाल्यामुळे जानकर यांच्या जीवावरचे संकट टळण्यास मदत झाली. ग्रामस्थांसह गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी जयश्री काळे , केंद्रप्रमुख दादाजी बागूल यांनी शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीचे कोैतुक केले.

शाळेत शिकविणे हा नित्याचा भाग आहे. मात्र तिथल्या समाजाशी एकरूपता साधणे, लोकांच्या सुखदुःखांत सहभागी हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यातून जानकर यांच्या जीवावरचे संकट टळले, याचा आनंद वाटतो.
- विजय कदम, प्राथमिक शिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT