पश्चिम महाराष्ट्र

"हुमणी'साठी 10 लाख; जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचा निर्णय

सकाळवृत्तसेवा

सोलापूर- जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुका वगळता उर्वरित आठ तालुक्‍यातील उसाला "हुमणी' या रोगाने ग्रासले आहे. यापासून शेतकऱ्यांना दिलासा देता यावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 10 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली. 

जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, सांगोला, करमाळा या तालुक्‍यातील जवळपास 29 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस पीक "हुमणी'ने बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या रोगाच्या औषधासाठी शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

सेस फंडातील 10 लाख रुपये या आठ तालुक्‍यातील शेतकऱ्यांना देण्यात येईल. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील 10 टक्के रक्कम टाकून या रोगासाठी औषधांची खरेदी करायची आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बैठकीसाठी गणेश पाटील, संगीता मोटे, रेखा राऊत, दादासाहेब बाबर, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. पी. बेंदगुडे उपस्थित होते.

आज झालेल्या बैठकीमध्ये औजारांसाठी ज्या शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. त्याला मंजुरी देण्यात आली. त्या शेतकऱ्यांनी पुढील 15 दिवसांमध्ये पंचायत समितीशी संपर्क साधून संबंधित औजारांची खरेदी करायची आहे. त्याची पावती पंचायत समितीला दिल्यानंतर त्याच्या अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. - मल्लिकार्जुन पाटील, सभापती, कृषी समिती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT