murder.jpg
murder.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

अन् 'ते' रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहचले

सकाळवृत्तसेवा

सातारा: मॉर्निंग वॉक करताना अचानक डोक्यात धारदार शस्त्राने वार करून निवृत्त नायब तहसीलदार अनिल साळुंखे (वय ५९,रा. देशमुख कॉलनी, सदर बझार सातारा) यांना लुटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साठेआठच्या सुमारास सदरबझार येथे घडली. यामध्ये नायब तहसीलदार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साळुंखे हे शुक्रवारी साठेआठ वाजता देशमुख कॉलनीमध्ये मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ट्रॅकवर चालत असताना तेथे दोन युवक आले. त्यापैकी एक युवक त्यांच्याशी ओळख काढून बोलू लागला. याचवेळी दुसऱ्या युवकाने पाठीमागून धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यात अचानक वार केला. त्यामुळे ते खाली पडले. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या खिशातील साडेपाच हजारांची रोकड आणि मोबाइल घेऊन पलायन केले. चोरटे तेथून निघून गेल्यानंतर साळुंखे हे रक्तबंबाळ अवस्थेत घरी गेले. अशा अवस्थेत त्यांना पाहताच घरातल्यांना धक्का बसला. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, डोक्याला सहा टाके घातले आहेत.

या प्रकाराची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी देशमुख कॉलनीमध्ये जाऊन परिसरातील सीसीटीव्ही तपासणीची मोहीम हाती घेतली. याबाबत साळुंखे यांचा मुलगा ओंकार साळुंखे याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात सातत्याने लुटमारीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

SCROLL FOR NEXT