toll
toll sakal
पश्चिम महाराष्ट्र

टोल दरवाढीचा वाहनधारकांना भूर्दंड

सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शुक्रवारी (ता. 1) मध्यरात्रीपासून टोल दर वाढविल्याने वाहनधारकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या पेट्रोल-डिझेल अशा इंधनाची दरवाढ झाली असून त्यामुळे सर्वजण हैराण आहेत. अशातच आता टोल दरवाढीचा वाहनधारकांना भूर्दंड बसत असल्याने संताप व्यक्त होत असल्याचे चित्र कोगनोळी टोलनाका परिसरात दिसत होते. येथील राष्ट्रीय महामार्गावरर असलेल्या टोलनाक्यावर येणाऱ्या 95 टक्के वाहनधारकांकडे फास्टॅग सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित पाच टक्के वाहनधारक रोख रक्कम भरून टोल नाका पास करतात. फास्टॅग नसणाऱ्या वाहनधारकांकडून डबल टोल कर आकारणी केली जात आहे. कोगनोळी टोलनाक्यावर फास्टॅग असणाऱ्या वाहनधारकांना परतीचा टोल सुट फायदा मिळत आहे. ज्या वाहनधारकांकडे फास्टॅग नाही अशांना या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

टोलनाक्यावर वाहनधारकांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार अशा सुविधाही दिल्या आहेत. येथे 105 कर्मचारी काम करत असून या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये काम सुरू आहे.कोरोना कमी झाल्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांची संख्या वाढली आहे. दिवसाला सुमारे पंधरा हजार वाहने टोल नाक्यावरून ये-जा करत असल्याची माहिती टोल व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी दिली.यावेळी संदीप डोंगळे, प्रकाश कागले, नारायण पाटील, योगेश जोशी, गजानन कागीनकर उपस्थित होते.

टोल वाढलेले दर...

वाहनाचा प्रकार आधीचे दर वाढलेले दर परतीचा प्रवास (कंसात जुना दर)

कार व लहान वाहने 75 85 125 (115)

लाईट मोटार व्हेइकल 115 135 200 (175)

ट्रक व बस 245 280 420 (370)

थ्री एक्सल वाहने 270 305 460 (405)

4 एक्सेल 6 एक्सल 385 440 660 (580)

7 एक्सलच्या पुढे 470 535 800 (705)

महिना पास कार 275 315

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT