bhigwan.
bhigwan. 
पश्चिम महाराष्ट्र

महिला व मुलींच्या संरक्षणासाठी सर्वोच्य प्राधान्य - महेश ढवाण

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण - भारतीय संस्कृतीमध्ये मुली व महिलांना देवतांचा दर्जा दिला जातो याचा विसर तरुण पिढीला पडत आहे. समाजामध्ये वाढत असलेल्या छेडछाडीच्या घटना ह्या सुसंस्कृत समाजासाठी लाजीरवाणी बाब आहे. भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने महिला व मुलींचे संरक्षण व छेडछाडीसारख्या विकृतीला रोखण्यास सर्वोच्य प्राधान्य असेल असे प्रतिपादन येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले.

येथील रयत शिक्षण संस्थेचे भैरवनाथ विदयालय व भिगवण पोलिस ठाणे यांचे संयुक्त विदयमाने मुलींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी कला महाविदयालयांच्या प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, मुख्याध्यापक अशोक बंदिष्टी, प्रा. प्रशांत चवरे,  सुरेश पिसाळ, दिपक रेडके, माधवी घाडगे, शहादेव आवंतकर उपस्थित होते. श्री. ढवाण पुढे म्हणाले, मुली या सहनशील असतात याचा अर्थ छेडछाड सहन करावी असा होत नाही. रोडरोमिओ हा सर्वात भित्रा प्राणी असतो त्यामुळे मुलींनी न घाबरता त्याचा प्रतिकार केला पाहिजे. छेडछाडीबाबत मुलींनी झिरो टॉलरन्सची भुमिका ठेवल्यास अशा बाबीस निश्चित आळा बसेल. यावेळी महेश ढवाण यांनी विदयार्थिंनींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.

अशोक बंदिष्टी म्हणाले, शिक्षण, नोकरी व्यवसाय, विवाह या जीवनातील काही अवस्था आहे. मुलींनी शिक्षण घेत असताना इतर बाबींकडे दुर्लक्ष करुन त्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास पालक, शिक्षक व पोलिस आपल्या संरक्षणासाठी आहे याची जाणिव ठेवावी. यावेळी दिपाली मारणे हिने विदयार्थिंनीच्या वतीने भुमिका मांडली. 

प्रास्ताविक व सुत्रसंचालन तुषार वाबळे यांनी केले आभार पुष्पा काळे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रमिला कोकणी, विदया दाभाडे, तृप्ती मोरे, नलिनी मेरगळ, साधना सपकाळ, महानंद आवंतकर, गंगा नागरगोजे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT