Solapur
Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

सुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना 

परशुराम कोकणे

सोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन विभागाच्या केटरिंग कॉलेज परिसरात पर्यटकांसाठी छोटी रेल्वे सुरू करावी. येथे पर्यटनाला चालना मिळावी यासाठी लक्ष घातल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

"सकाळ'ने हाती घेतलेल्या प्रदूषणमुक्त संभाजी तलाव अभियानामुळे गेल्या वर्षभरात अनेक सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करून 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यासंदर्भात सहकारमंत्री श्री. देशमुख म्हणाले, "हा परिसर निसर्गसंपन्न आहे. संभाजी तलाव परिसराच्या सुशोभीकरणासोबतच स्मृती उद्यान आणि केटरिंग कॉलेज परिसरात सुधारणा व्हावी. येथे पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी छोटी रेल्वे सुरू करावी. यासंदर्भात मी महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांना बोललो आहे. शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.' 

राज्य आणि केंद्र शासनाने संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी निधी मंजूर केला आहे. फक्त संभाजी तलावाचे सुशोभीकरण करून थांबलो तरी जवळच असलेले स्मृती उद्यान आणि महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे केटरिंग कॉलेज तसेच राहून जाईल. या तिन्ही ठिकाणांचा एकत्रित विकास व्हावा याकरिता मी पाठपुरावा करतोय. 
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री 

सोलापूरकर म्हणतात.. 
संभाजी तलाव परिसरात मजबूत तटबंदी उभारावी. कपडे, वाहने धुणे, पोहणे, मूर्ती विसर्जन, ड्रेनेज पाणी कायमस्वरूपी बंद करावे. तलावाच्या आतील बाजूला लेझर लाइट शो सुरू करावा. तटबंदीवर स्वच्छ सोलापूर, हरित सोलापूर यासह इतर रनिंग लाइट शो करता येईल. तलावाच्या मध्यभागी म्युझिकल फाउंटन करावा. तलावाच्या तळातून आकाशाच्या दिशेने बीम/पार लाइट उभारावेत. पायडल बोटिंग, एखादी स्पीड बोट, कायकिंग बोट सुरू करावी. झाशीची राणी पुतळ्याजवळील बागेचे सुयोग्य नियोजन करावे. शासनाने मंजूर केलेला निधी परत जाण्याआधी, निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी कामाला सुरवात व्हावी. 
- अमेय केत, विजयपूर रोड परिसर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT