Traffic Issues In Gadhinglaj
Traffic Issues In Gadhinglaj 
पश्चिम महाराष्ट्र

वाहतूक नियोजनात "सौजन्य' कमी, "इगो' जास्त

अजित माद्याळे

गडहिंग्लज : शहरातील मुख्य रस्त्यावर सम-विषम पार्कींगची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होत असली तरी नियम करणारे व पाळणाऱ्यांमध्ये वरचेवर वादावादीचे प्रकार घडत आहेत. या वादावादीत सुरूवातीला असणारी "सौजन्या'ची भाषा कालांतराने "इगो'मध्ये रूपांतरीत होत आहे. यामुळे नियमांची पायमल्ली तर होतेच, शिवाय यातून दोन्ही बाजूंचा "इगो हर्ट' झाल्याने सुरळीत सुरू असलेल्या वाहतूक नियोजनात गोंधळ उडण्याचा धोका वाढत आहे. 

अनेक वर्षापासून गडहिंग्लज शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीचा बट्ट्याबोळ होता. किती अधिकारी आले आणि गेले. नियोजन कागदावरच राहिले. चार-पाच महिन्यापूर्वी सम-विषम पार्कींग नियोजनाला मूर्तस्वरूप आले. या नियोजनाचे अधिसूचनेत रूपांतर करून पोलिस प्रमुखांनी स्थानिक पोलिस ठाण्याला सम-विषम पार्कींगच्या अंमलबजावच्या लेखी सूचना दिली. त्यानुसार आजरा रोडवरील गिजवणे ओढा ते मार्केट यार्डपर्यंतच्या अंतरात त्याची अंमलबजावणी सुरू झाली. एक वाहतूक पोलिस, टोचन वाहनासह (क्रेन) स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित झाली. टोचन वाहन व त्यावरील कर्मचाऱ्यांचा ठेका आहे. या नियोजनामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी होण्यास मदतच झाली आहे. पार्कींगला शिस्त आली. रस्त्यावरील इतर वाहतुकीला चांगली रूंदीही मिळाली. अशाच स्वरूपाचे नियोजन बाजारपेठेसह इतर वर्दळीच्या रस्त्यांवरही करण्याची मागणी होवू लागली. 

एकीकडे हा सकारात्मक बदल पहायला मिळत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र वाहनावरील कारवाईच्या निमित्ताने वादावादीचे प्रकारही वाढत आहेत. मुळात पोलिस यंत्रणेने सुरूवातीला सूचना देवूनच अमलबजावणी सुरू केली आहे. पहिले काही दिवस कारवाईत सूटही देण्यात आली. परंतु, काही वाहनधारकांकडून नियमांची पायमल्ली कमी झालेली दिसत नाही. सम-विषमचे ठिकठिकाणी फलक लावले आहेत. आणखीन काही आवश्‍यक ठिकाणी फलकांची गरज आहे, हे मान्य. दुकानदारसुद्धा पार्कींगची माहिती देणारे फलकही लावत आहेत. तरीसुद्धा चार-पाच महिन्यापासून झालेला हा बदल वाहनधारकांकडून का स्वीकारला जात नाही, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे.

आधी नियम मोडायचा आणि नंतर कारवाईची वेळ आली तर कोणाचा तरी वशिला लावायचा. हे जमलेच नाही तर नियम करणाऱ्यांशी हुज्जत घालायचे. यातून वादावादी वाढत जावून त्याचे रूपांतर "इगो'मध्ये होत आहे. नियम करणारा आणि पाळणारा आपापल्या जागेवर ठाम राहतात. सूचना करताना अरेरावीला बगल देवून सौजन्याची भाषा वापरली तर वाहनधारकसुद्धा प्रतिसाद देतात. एखादा वाहनधारक बाहेरून आलेला असला आणि तो या नियोजनाबाबत अज्ञानी असेल तर त्याच्याशी नियम करणाऱ्यांनी सौजन्यपूर्ण भाषा वापरणे गरजेचे ठरते. 

संवादातून समज-गैरसमज दूर व्हावेत 
वशिल्याची झूल पांघरलेल्या नियम पाळणाऱ्यांनी वारंवार नियमांची पायमल्ली करण्यात धन्यता न मानलेले बरेच आहे. अशा प्रकारामुळे लोकांसाठी तयार केलेले वाहतूक नियोजन विस्कळीत होण्यास वेळ लागणार नाही. दोन्ही घटकांनी सौजन्यपूर्ण संवादातून समज-गैरसमज दूर केले तर शिस्तबद्ध वाहतुकीच्या माध्यमातून गडहिंग्लजचे सौंदर्य अधिक खुलेलच, शिवाय दोघांचाही "इगो' दुखावणार नाही, एवढे मात्र निश्‍चित. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT