पश्चिम महाराष्ट्र

मिरजेपर्यंतच्या पाच रेल्वेगाड्या सांगलीतून सोडण्यासाठी सहमती 

सकाळवृत्तसेवा

सांगली - मिरजेपर्यंत येणाऱ्या सोलापूर एक्‍सप्रेस, कुर्डूवाडी पॅसेंजर, पंढरपूर सुपरफास्ट, परळी पॅसेंजर तसेच बेळगाव पॅसेंजर या गाड्या सांगली स्थानकापर्यंत आणाव्यात अशी आग्रही मागणी मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

काल (गुरुवारी ) मुंबईत झालेल्या बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी व सल्लागार सदस्य उपस्थित होते. यावेळी सांगली स्थानकाच्या सुधारणांसंदर्भात सांगली रेल डेव्हलपमेंट ग्रुपने अनेक मागण्या मांडल्या. 

मिरजेपर्यंत येणाऱ्या अनेक गाड्या सांगलीपर्यंत आणल्यास प्रवाशांची सोय होईल आणि रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी वाढ होईल याचे दाखले सदस्यांनी दिले. डेव्हलपमेंट ग्रुपच्यावतीने कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष केतन शहा यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. शर्मा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली.

यावेळी अधिकाऱ्यांनी सांगलीतून नवीन गाड्या व सध्याच्या गाड्यांच्या विस्तारासाठी दुपदरीकरण व विद्युतीकरण झाल्यानंतर सुरु होतील अशी भूमिका घेतली. तथापि सदस्यांनी त्यासाठी वाट पाहण्याची आवश्‍यकता नाही हे पटवून दिले.

एकेरी मार्गावरसुद्धा नव्या गाड्या धावू शकतात. अधिकाऱ्यांनी ही मागणी तत्त्वतः मान्य करीत पुढील दोन महिन्यात याबाबत सविस्तर अहवाल तयार करून योग्य ती कार्यवाही करू अशी हमी दिली. 

सांगलीतून नवीन गाड्या, टर्मिनल फॅसिलिटी आणि पीटलाइनची मागणी मध्य रेल्वेने त्वरीत मंजूर करावी; त्यामुळे सांगलीच्या बाजारपेठेला फायदा होईल. सांगली स्थानकातील तांत्रिक बाबी पुर्ण झाल्यानंतर सोलापूर, पंढरपूर, कुर्डूवाडी व लातूरसाठी गाड्या सोडता येतील असेही त्यांनी सांगितले. 

खासदार संजय पाटील यांनी सांगली स्थानकात पीटलाईनचा आग्रह धरला आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चेनंतर पीट लाईन व टर्मिनल फॅसिलिटीच्या विषयावर अंतिम निर्णयाची अपेक्षा आहे. आता स्थानिक चेंबर ऑफ कॉमर्सने आग्रही भूमिका घ्यावी. आम्ही त्यांच्यासोबत राहू. पुढील सहा महिन्यात या सर्व गाड्या सांगलीतून सुरु होऊ शकतात. 
- केतन शहा 

प्रवासी संघटनेचे पदाधिकारी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT