belguam krt
belguam krt esakal
पश्चिम महाराष्ट्र

‘परिवहन’चा अंतिम इशारा; सेवेवर हजर राहा; अन्यथा?

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव विभागातील १९१ प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी सेवेवर हजर राहावे अन्यथा बडतर्फ करणार असल्याची अंतिम नोटीस परिवहन महामंडळाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे. यासह मंडळातील ५५ वर्षांवरील २०२ कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत (ता. १९) शारीरिक क्षमता प्रमाणपत्र हजर करावे, अशी नोटीस बजावण्यात आली असून, प्रमाणपत्र सादर न केल्यास सक्तीची निवृत्ती स्वीकारावी लागणार आहे.

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात या मागणीसाठी परिवहन कर्मचारी ७ एप्रिलपासून बेमुदत संपावर आहेत. संपाला रविवारी (ता. १८) बारा दिवस झाले असून, त्याचा परिवहन सेवेवर गंभीर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा फास आवळला आहे. महामंडळाने शुक्रवारपर्यंत तीन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यासह दोघांना निलंबित केले आहे. त्यापाठोपाठ आता कर्मचाऱ्यांना वृत्तपत्रातून अखेरची नोटीस बजावत कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

परिवहन सेवा ही अत्यावश्यक सेवा असून, परिवहन कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या अनधिकृत संपाला पाठिंबा देत प्रशिक्षण काळात संपावर जात येत नाही. कर्मचाऱ्यांनी लेखी उत्तरासह कामावर तातडीने हजर व्हावे. अन्यथा त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल, असे प्रशिक्षणार्थी १९१ कर्मचाऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीत म्हटले आहे. बेळगाव परिवहन विभागात मध्यवर्ती, शहर व ग्रामीण, ऑटोनगर, खानापूर, रामदुर्ग, बैलहोंगल या आगारांचा समावेश आहे. यातील १९१ प्रशिक्षणार्थी कर्मचारी या नोटिशीमुळे अडचणीत आले आहेत. परिवहन महामंडळ ५५ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शारीरिक क्षमता

प्रमाणपत्र मिळवावे लागते. १ एप्रिल २०२१ नुसार मंडळाच्या बेळगाव विभागात ५५ वर्षावरील २०२ कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना १९ एप्रिल पूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळविलेले प्रमाणपत्र परिवहनकडे जमा करणे आवश्‍यक आहे. प्रमाणपत्र वेळेत जमा न केल्यास त्यांना सक्तीची निवृत्ती दिली जाणार आहे. परिवहन बेळगाव विभागाने रविवारी ही जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोमवारचा (ता. १९) एकच दिवस कर्मचाऱ्यांकडे शिल्लक आहे.

शेवटची संधी

कर्मचारी ७ एप्रिलपासून बेमुदत संपावर असल्याने परिवहन महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. महामंडळाने शुक्रवारपर्यंत तीन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यासह दोघांना कायमस्वरूपी निलंबित केले आहे. त्यापाठोपाठ आता कर्मचाऱ्यांना वृत्तपत्रातून शेवटची नोटीस बजावत कामावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT