पश्चिम महाराष्ट्र

पावणे दोन कोटीचा गुटखा पुणे-बंगळूर महामार्गावर जप्त 

सकाळवृत्तसेवा

गोकुळ शिरगाव, जि. कोल्हापूर - पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून बंगळूरच्या दिशेने गुटखा घेऊन जाणारे दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले. यातून सुमारे पावणे दोन कोटींचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन ट्रक (एमएच 11 ए 5505) व (एमएच 21 एक्‍स 7740) ताब्यात घेत चालक सलमान अमितखान व परवेज अजीज उल्ला खान यांना ताब्यात घेतले आहे. 

गोकुळ शिरगाव पोलिस व अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ट्रकमधील सुगंधी पान सुपारी व सुगंधी पान तंबाखूचे मोजमाप केले. 120 (रोयॉल 717 सुगंधी तंबाखू कंपनीची 150 पोती), रोयॉल 717 सुगंधी हिरा पान मसाला कंपनीची 290 पोती) असा सुमारे पावणे दोन कोटीचा सुगंधी पान मसाला तंबाखू (मिश्रित) गुटख्याच्या साहित्यासह पोलिसांनी ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे.

आचारसंहिता सुरू होताच महामार्ग पोलिसांनी उजळाईवाडी हद्दीत शिताफीने कारवाई करत सुगंधी तंबाखू व पान मसाला पकडला. महामार्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पोवार, सहायक फौजदार शंकर कोळी, हवालदार संदीप पाटील, तात्यासाहेब मुंढे, रवींद्र नुल्ले, प्रकाश कदम, शहाजी पाटील, योगेश कारंडे, अभिजित चव्हाण, तौसिफ मुल्ला, आशिष कोळेकर, रामदास मेंटकर आदींनी ही कारवाई केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT