पश्चिम महाराष्ट्र

दाजीपूरमध्ये शिकारीस गेलेले दोघे अटकेत

सकाळवृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक - दाजीपूर अभयारण्यात शिकार करायला गेलेल्या दोघांना वन्यजीव विभागाने अटक केली. यामध्ये सहभागी असलेला आणखी एक जण फरारी आहे. अटक केलेल्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. गौतम रघुनाथ कदम आणि बबन धोंडी कदम (दोघेही रा. शेळप, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. 

संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीची किंक्रांत साजरी करण्यासाठी शिकार करणे ही परंपरा आजही अनेक गावांमध्ये आहे. शिकार झाल्याशिवाय गावात पाय टाकायचा नाही, अशा रुढी आजही आहेत. याची माहिती असल्याने कालपासून वन्यजीव विभागाने सर्व परिक्षेत्रातील गस्त कडक केली होती. याच रुढी-परंपरांचे हे दोघे बळी पडले.

शेळप हे गाव अभयारण्याच्या मध्यावर आहे. सभोवती जंगल आहे आणि यामध्ये वावर करण्यास प्रतिबंध आहे. शस्त्र किंवा आगपेटी घेऊन जाणेही गुन्हा ठरतो. असे असतानाही काल रात्री गौतम, बबन आणि अन्य काही जण शिकारीच्या निमित्ताने शेळप गावाशेजारील जंगलात ठासणीची बंदूक, फटाके, बॅटरी अशा साहित्यानिशी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास संशयास्पद हालचालीने फिरताना येथील सहायक वनसंरक्षक प्रशांत तेंडुलकर व या बीटचे वनरक्षक के. एस. पावरा यांना आढळले.

त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन साहित्य जप्त केले. या दोघांसह अन्य एक जण फरारी असल्याचे श्री. तेंडुलकर यांनी सांगितले. आज अटक केलेल्यांना तालुका न्यायालयासमोर हजर केले असता त्यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT