Bhavani nagar murder case
Bhavani nagar murder case sakal media
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : भवानीनगर खून प्रकरणांत आणखी दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : भवानीनगर रिअल इस्टेट व्यावसायिकाची हत्या प्रकरणांत पोलिसांना मंगळवारी (ता.२२) आणखी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, दोघेही बेळगावातील कपिलेश्‍वर कॉलनीतील रहिवासी आहेत. संजय चिन्नस्वामी रजपूज (वय ४८), विजय जागृत (वय ३५, दोघे रा. कपिलेश्‍वर कॉलनी, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. यामुळे प्रकरणांत आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली असून, आणखी चौघे फरारी आहेत.

भवानीनगर येथील रिअल इस्टेट व्यावसायिक राजू मल्लाप्पा दौड्डबोम्मण्णावर (वय ४६, मूळ रा. हालगा-बस्तवाड, सध्या रा. मंडोळी रोड, भवानीनगर) याची सुपारी देऊन हत्या झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. तसेच त्यावरील आता एकेक पदर उलगडण्यास सुरु झाले आहे. यातील मुख्य सूत्रधारांचा छडा पोलिसांनी लावला आहे. राजू यांची पत्नी किरण आणि त्याचे भागीदार यांना अटक करून कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. यासोबत आता संजय रजपूज व विजय जागृत यांनी सुपारी देऊन राजूवर मिरचीपूड फेकून खून केल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

रिअल इस्टेट व्यावसायिक राजू याची हत्या आर्थिक व्यवहार आणि एकापेक्षा जास्त विवाहातून घडल्याचे पुढे येत असले तरी ही हत्या पूर्वनियोजित होती. शिवाय सराईत गुन्हेगारांकडून हत्याकांड घडविल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेत आहेत. प्रकरणांतील पाळेमुळे खणून काढण्यास सुरवात केली आहे. पत्नी किरण आणि भागीदार मिळून १० लाखांची सुपारी देऊन राजूची हत्या घडवली आहे. पण, १५ मार्चला आणखी कोण होते, त्यांची माहिती पोलिस घेत आहेत. प्रकरणांमधील संजय आणि विजयला अटक झाली आहे. त्याच्या साथीदारांचा तपास सुरु आहे. मिरचीपूड कोणी टाकली आणि शस्त्रांनी हल्ला कोणी केला, त्याचा तपास पोलिसांनी घेण्यास सुरु केले आहे. तसेच फरारी चौघांना अटक करण्यासाठी जाळे विणले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT